निवडणुकी
निवडणुकी

नेवासा – राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि त्याअंतर्गतच्या १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठीचा प्रचार गुरुवारी रात्री थांबला. निवडणूक प्रचाराची मुदत रात्री १२ वाजेपर्यंत होती. मात्र रात्री १० नंतर ध्वनिक्षेपकाची परवानगी नसल्याने खरा प्रचार रात्री १० वाजताच थंडावला.

निवडणुकी

शनिवार, ७ फेब्रुवारी रोजी या निवडणुकांसाठी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान होईल. तर सोमवार, ९ फेब्रवारी रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाईल. जिल्हा परिषद निवडणूक प्रचाराच्या निमित्ताने बारामतीला जात असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले.

निवडणुकी

त्यामुळे मतदान दोन दिवस पुढे ढकलण्यात आले होते. अजित पवार यांच्या निधनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी प्रचारसभा न घेण्याचा निर्णय घेतला. मात्र, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोकण, पश्चिम महाराष्ट्रात प्रचारसभा घेतल्या. निवडणूक होत असलेल्या जिल्हा परिषद रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव आणि लातूर या १२ जिल्हा परिषदा आणि त्यांतर्गतच्या १२५ पंचायतसमित्यांसाठी. ही निवडणूक होत आहे.

newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

निवडणुकी
निवडणुकी

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

निवडणुकी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!