नेवासा – भेंडा बुद्रुक येथील सेवानिवृत्त नायब तहसीलदार मच्छिद्र यशवंत बर्डे यांच्या भेंडा तरवडी रस्त्यावर असलेल्या बर्डे वस्तीवर सोमवारी (दि.१०) रोजी पहाटेच्या सुमारास पाच हत्यारधारी अज्ञात चोरट्याने धाडसी दरोडा टाकला. बर्डे वस्तीवरील सात तोळे नऊ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने रोख रक्कम, मोबाईल असा एकूण ४ लाख ३७ हजार २०० रुपयांचा ऐवज चोरी करून अज्ञात चोरटे पसार झाले. चोरट्यांना बर्डे यांनी मज्जाव करण्यासाठी त्यांच्याकडे असलेल्या परवानाधारी रायफलने धमकाविण्याचा प्रयत्न केला असता या अज्ञात चोरट्यांनी त्यांचीच रायफल ताब्यात घेऊन त्यांच्याजवळ असलेला चाकू बर्डे यांच्या डोक्यात मारून जखमी केल्याची घटना घडली. या घटनेने परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
याबाबत जयश्री दौलत बड़े (वय३३वर्ष), रा.बर्डे वस्ती, भेंडा शिवार ता. नेवासे यांनी नेवासे पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले, मी वरील ठिकाणी पती दौलत बडे, सासरे मच्छिद्र बडे, सासू विमलबाई व एक मुलगी ओजस्वी असे मिळून राहतो. मी तसेच माझे पती शिक्षकाची नोकरी करुन आमचे परिवाराचा उदरनिर्वाह करतो. सोमवारी (दि.९) रोजी रात्री ११ वाजेचे सुमारास आम्ही सर्व मी माझे पती व मुलगी बेडरुममध्ये झोपलेले होते. मध्यरात्री मंगळवारी (दि.१०) रोजी अंदाजे २ वाजेचे सुमारास सासू विमलबाई यांचा आरडाओरडचा आवाज आला. माझे पतीने बघितले असता कोणीतरी बाहेरुन दरवाजा तोडण्याचा प्रयत्न करीत
आ. लंघे पाटील यांच्या सूचना आ. लंघे पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन बर्डे कुटुंबीयांची विचारपूस केली.

संबंधित पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा करून या धाडसी दरोड्याचा वेगाने व सखोल तपास करून आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याच्या सूचना पोलीस निरीक्षक महेश पाटील यांना दिल्या होते. माझे पती यांनी घरातील परवाना असलेली रायफलचा धाक दाखवून घरात घुसलेल्या चोरांना घाबरविण्याचा प्रयत्न केला. परंतु घरात अचानक ४ ते ५ अनोळखी चोरटे घुसल्याने त्यापैकी एकाने त्याचे हातातील पिस्टलसदृष्य वस्तुने माझे पती यांना धाक दाखवून रायफल हिसकावून घेतली. त्यांच्यापैकी एकाने चाकुच्या मागच्या बाजूने माझे पती यांचे कपाळावर मारहाण केली. त्यानंतर हे ५ दरोडेखोर आमच्या बेडरुमध्ये आले, त्यापैकी एकाने त्याचे हातातील चाकुचा आम्हाला धाक दाखवून शांत राहण्याचा इशारा दिला.

त्यांच्यापैकी तिघांनी माझे पती यांचे हात पाय बांधून त्यांना बेडवर झोपवून दिले. सासरे व मुलगी यांना देखील बेडच्या एका बाजूला व सासू यांना बेडच्या खाली बसविले. त्यापैकी एकाने मला चाकू दाखवून घरातील कपाटाच्या चाव्या मागितल्याने मी चाव्या दिल्या. त्यांनी सर्व कपाट उघडून दागिने व रोख रक्कम काढून घेतली. त्यानंतर सासू विमलबाई यांचे रुममधील कपाट उघडून दागिने व रोख रक्कम काढून घेतली. घरात घुसलेल्या इसमांपैकी काही हिंदी भाषेत व काही मराठी भाषेत बोलत होते. दागिने एका टॉवेलमध्ये गुंडाळून माझे पती यांचे बॅगमध्ये टाकून रायफल सोबत घेऊन घराचे सर्व दरवाजे बाहेरुन बंद करून सुमारे ३ वाजेचे सुमारास ते सर्व पसार झाले.

पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास शेजारी दत्तात्रय क्षीरसागर यांना आम्ही आवाज दिला. काही वेळाने त्यांनी दरवाजे उघडले. घराबाहेर मोबाईल सापडले. माझे पती यांनी पत्रकार नामदेव शिंदे यांना फोन करुन पोलिसांना कळविण्याचे सांगितले. अशा अशयाची फिर्याद जयश्री बर्डे यांनी नेवासे पोलिसांत दाखल केली. पोलीस निरीक्षक महेश पाटील घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी फॉरेन्सिक टीम व श्वानपथकाला घटनास्थळी पाचारण केले. श्वानपथकाने माग काढण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यात यश आले नाही. आ. विठ्ठलराव लंघे पाटील, शेवगावचे उपविभागीय पोलीस अधिकारी नीरज राजगुरू, स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने घटनास्थळी भेट दिली.
गणेश बर्डे याने रायफल काढून चोरट्यांना धाक दाखविण्याचा प्रयत्न केला. मात्र, जाताना बर्डे यांची रायफल घेऊन गेले, सकाळी उसात ती रायफल आढळून आली. चोरट्यांशी झालेल्या झटापटीत यशवंत बर्डे यांच्या हाताला तर गणेश बर्डे यांना दरोडेखोरांनी चाकू मारल्यामुळे ते जखमी झालेले असून दहशत पसरली आहे.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

