आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
जबरी चोरी
जबरी चोरी

नेवासा – दिनांक १७/०६/२०२६ रोजी पहाटे ०२/३० वा.ते ०३/०० वा.चे दरम्यान भेंडा खुर्द गावचे शिवारातील फिर्यादीचे नवलेवस्ती येथील बंद घराचे खिडकीचे गज काढुन अनोळखी इसमांनी त्यांचे हातातील लोंखंडी पाईप, कट्टा, कोयता, असे हत्यारे घेवुन आमचे घरात प्रवेश करुन फिर्यादीचे भाऊ यांना मारहाण करुन बळजबरीने घरातील रोख रक्कम व सोन्याचे मोबाईल फोन चोरुन नेले आहे. सदर घटनेबाबत फिर्यादी यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन नेवासा पोलीस स्टेशन गु. र. नं. ५१२/२०२६ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३३१ (४), ३०५,३०९ (६) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

जबरी चोरी

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक, संतोष मुटकुळे यांचे नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि / हरिष भोये, पोउपनि/संदिप मुरकुटे, पोलीस अंमलदार विष्णु भागवत, फुरकान शेख, बाळासाहेब नागरगोजे, किशोर शिरसाठ, भाऊसाहेब काळे, अमोल कोतकर, बाळासाहेब खेडकर, महिला पोलीस अंमलदार सोनल भागवत, चालक भगवान धुळे, अरुण मोरे यांचे पथके तयार करुन सदर पथकास आरोपीची माहिती काढुन आरोपीस अटक करणेबाबत सुचना व मार्गदर्शन करुन पथकास रवाना केले.

जबरी चोरी

दिनांक २१/०६/२०२६ रोजी नमुद पथक गुन्ह्यातील आरोपीची माहिती काढत असतांना पथकास तांत्रिक विश्लेषण व गुप्त बातमीदाराचे मार्फतीने सदरचा गुन्हा हा इसम नामे विकी ज्ञानेश्वर पवार रा. ब्राम्हणगाव वेताळ ता. श्रीरामपुर याने त्याचे साथीदासह केला असुन तो मुकिंदपुर (नेवासा फाटा) ता. नेवासा येथे नातेवाईकांकडे येणार असल्याची खात्रीशीर माहिती प्राप्त झाली. त्यानुसार पथकाने मक्तापुर रोड मुकिंदपुर शिवारात सापळा रचुन थांबले असता एक इसम संशयीतरित्या मिळुन आला त्यास ताब्यात घेवुन त्याचे नांव गाव विचारले असता त्याने त्याचे नांव १) विकी उर्फ विकास ज्ञानेश्वर पवार वय-३२ वर्षे रा. ब्राम्हणगांव वेताळ ता. श्रीरामपुर असे असल्याचे सांगितले त्यास नेवासा पोलीस स्टेशनचे वरील गुन्ह्याबाबत विश्वासात घेवुन विचारपुस करता त्याने सदरचा गुन्हा त्याचे साथीदार नामे २) राहुल बबन वाघमारे रा. रांजणगाव खुर्द ता. राहाता (फरार) अशांनी मिळुन केल्याची कबुली दिली आहे.

जबरी चोरी

ताब्यातील आरोपीस वर नमुद गुन्ह्याचे तपासकामी नेवासा पोलीस स्टेशन येथे हजर करुन अटक करण्यात आलेली असुन गुन्ह्याचा पुढील तपास नेवासा पोलीस स्टेशन करीत आहे.

जबरी चोरी

सदरची कारवाई मा. श्री. मुम्मका सुदर्शन, पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर येथील वरील पोलीस अधिकारी यांनी केलेली आहे.

newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

जबरी चोरी
जबरी चोरी
जबरी चोरी

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

जबरी चोरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!