
नेवासा – सन २०२५-२६ च्या गळितास गेलेल्या उसाचे पेमेंट काही साखर कारखान्यांकडे रखडल्याने उस उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे. थकीत उसाचे पेमेंट संबंधित कारखान्याने करावेत अशी मागणी नेवासा तालुक्यातील उस उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे. ऊस गाळपाला गेल्यानंतर साधारण १५ दिवसांत संबंधित शेतकऱ्यांना उसाचे पेमेंट देण्याचे जाहीर केले होते.

परंतु काही साखर कारखान्यांचा अपवाद वगळता इतर कारखान्यांनी एक ते दीड महिन्यानंतर शेतकऱ्यांना उसाच्या देयक मिळाले नसल्याने आणखी किती दिवस प्रतिक्षा करावी लागणार आहे असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. ऊस गाळपाला गेल्यानंतर उसाचे पैसे वेळेवर मिळत नसल्याचे शेतकरी आता उघड चर्चा करु लागले आहेत. नवीन ऊस लागवडीसाठी रासायनिक खते व खोडवा ऊस व्यवस्थापन करणे यासाठी आर्थिक ताण येत असल्याने ऊस तुटून गेल्यानंतर मशागत व रासायनिक खते देणे गरजेचे असल्याचे सांगत काही शेतकरी उसाच्या पेमेंटची वाट पाहत आहेत. पेमेंट रखडल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. त्यामुळे अशा साखर कारखान्यांनी तातडीने उसाचे देयक द्यावे अशी मागणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी केली आहे.

यंदाचा उस गळीत हंगाम यशस्वी झाला असून टार्गेट पूर्ण करण्यासाठी अनेक भागातून उस गळितास आला. गळीत जवळपास आवरत आले आहे. परंतु पेमेंट रखडले तर उसाच्या वजन काटा प्रकरणात काय झाले हा प्रश्न मात्र अनुत्तरीत राहिला असल्याची चर्चा शेतकऱ्यांत दबक्या आवाजात सुरू आहे.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

