नेवासा-जिल्ह्यातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी आणि अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्याच्या उद्देशाने पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) गेल्या तीन महिन्यांत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. १ मे ते ३१ जुलै या कालावधीत विविध प्रकारच्या ४४१ गुन्ह्यांचा छडा लावत अथवा कारवाया करून ७८६ आरोपींविरूध्द कारवाई केली असून, तब्बल ७ कोटी ८४ लाख १२ हजार ७१५ रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत विशेष मोहिम राबवून एलसीबीने धडक कारवाई केली. या
कालावधीत दोन खुनांचे गुन्हे उघड करत पाच आरोपींना अटक केली, तर पाच दरोड्यांच्या गुन्ह्यांमध्ये २४ आरोपींना जेरबंद केले. दरोड्याच्या तयारीचे पाच गुन्हे उघड करून २५ आरोपींवर कारवाई करण्यात आली. याशिवाय २० जबरी चोरी, २० घरफोडी आणि १३ चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यात आले असून, त्यामधून लाखो रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. अवैध वाळू उपशाविरोधातील मोहिमेत ३० कारवाया करून तीन कोटी ६९ लाख ३० हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आर्म अॅक्टअंतर्गत पाच कारवायांत नऊ आरोपींना अटक करण्यात आली.

मादक पदार्थांविरोधातील कारवाईत नऊ गुन्हे दाखल करून १२ आरोपींना अटक करण्यात आली, तर सेवनार्थी म्हणून
४० कारवायांत ४८ जणांवर कारवाई करण्यात आली. गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांच्या ११ कारवायांमध्ये एक कोटी १० लाख २३ हजार ४८२ रूपयांचा माल जप्त करण्यात आला. गोमांस प्रकरणात ११ कारवाया करून ५२ लाख रूपयांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दारूबंदी कायद्यांतर्गत १५३ कारवाया करून १५५ आरोपींना ताब्यात घेण्यात आले, तर जुगाराविरोधात ७७ कारवायांत ३०६ आरोपींवर कारवाई करण्यात आली. याशिवाय जीवनावश्यक वस्तू कायदा, महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १४२, पाहिजे आरोपींचा शोध आणि न्यायालयीन वॉरंट बजावण्याची कामगिरीही स्थानिक गुन्हे शाखेने यशस्वीरीत्या पार पाडली.
४४१ कारवाया करत ७८६ आरोपी गजाआड; ७.८४ कोटींच्या मुद्देमालावर जप्ती

५२ आरोपींवर प्रतिबंधात्मक कारवाई
सराईत गुन्हेगारांविरोधात प्रतिबंधात्मक कारवाई करत महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ अंतर्गत सहा टोळ्यांतील १५ जणांना हद्दपार करण्यात आले. कलम ५६ अंतर्गत नऊ प्रस्ताव मंजूर होऊन नऊ जणांना हद्दपार करण्यात आले. तसेच तीन आरोपींविरूध्द एमपीडीए अंतर्गत प्रस्ताव मंजूर झाले असून चार मकोका प्रस्तावांमधील २५ आरोपींविरूध्द मकोका कायद्यांतर्गत मंजुरी मिळाल्याची माहिती पोलिसांनी दिली.
जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी, संघटित गुन्हेगारीवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी आणि गुन्हेगारांमध्ये कायद्याची भीती निर्माण करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेकडून भविष्यातही अशाच प्रकारच्या धडक कारवाया सातत्याने सुरू राहतील.

संतोष मुटकुळे, पोलीस निरीक्षक, एलसीबी.
चौकट-यातील घरफोडीच्या तपासात psi दरवडे,हे.कॉ. बाळासाहेब नागरगोजे,लिपणे,भांडगे,बाळासाहेब खेडकर,येमुळ,धुळे यांनी जबाबदारी पार पाडली


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.







