भेंडा( प्रतिनिधी):– नेवासा तालुक्यातील बाभूळखेडा येथील रहीवाशी व सध्या सातारा जिल्हा परिषेदेत ग्रामपंचायत अधिकारी म्हणून कार्यरत असलेले ज्ञानेश बद्रीनाथ कमानदार यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगा मार्फत राज्यात ४८ व्या रँकने तालुका कृषी अधिकारी पदी निवड झाली.
ज्ञानेश कमानदार यांचे बाभूळखेडा येथे पहिली ते चौथी प्राथमिक शिक्षण,जळका येथील गुरुदास भास्करगिरी महाराज विदयालयात ५ वी ते १० वी माध्यमिक शिक्षण,११ वी १२वी लोणी येथील पद्मश्री विखे पाटील पब्लिक स्कूल मध्ये तर सोनई कृषी महाविद्यालयात कृषी पदवी पर्यंतचे शिक्षण पूर्ण झालेले आहे.

सन २०२५ मध्ये त्यांची ग्रामपंचायत अधिकारी पदी निवड झाल्याने ते सध्या सातारा जिल्हा परिषेदेत कार्यरत आहेत.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या कृषी विभागाच्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून, त्यामध्ये ज्ञानेश हा पहिल्याच प्रयत्नात राज्यात ४८ व्या रँकने उत्तीर्ण झाला आहे.
ज्ञानेश हे नेवासा तालुका तलाठी संघटनेचे अध्यक्ष व भेंडा गावचे माजी ग्राम महसूल अधिकारी बद्रीनाथ नारायण कमानदार यांचे चिरंजीव आहेत.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

