गुन्हा

नेवासा-तालुक्यातील सुरेशनगर येथे रस्त्यावरून ये-जा करण्याच्या कारणावरून वृद्ध महिलेस शिवीगाळ ,मारहाण करत जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची घटना घडली आहे याबाबत विमलबाई बाबासाहेब उभेदळ वय 65 वर्षे व्यावसायशेती रा.
सुरेशनगर नेवासा फाटा यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दि. 13/02/2026 रोजी दुपारी 12/30 वाजणेचे सुमारास मी सुरेशनगर शिवारातील ग्रामपंचायत शॉपिंग जवळ शेळ्या चारण्यासाठी घेवुन जात असताना माझा चुलत नातु अमृत सुरेश उभेदळ हा तेथे आला व म्हणाला की, तुझ्या बापाचा रस्ता नाही येथुन जायचे नाही म्हणुन शिवीगाळ करु लागला तेव्हा मी त्यास समजावुन सांगत असता त्याचा त्यास राग आल्याने लाथाबुक्यांनी मारहाण करून शिवीगाळ दमदाटी केली व परत या रस्त्याने गेली तर तुला जिवे मारुन टाकीन अशी धमकी दिली आहे व धक्का दिल्याने मी खाली पडले त्यावेळेस मला गुडघ्याला व हाताला मुका मार लागला आहे. त्यानंतर तो म्हणाला की, तुझा मुलगा कुठे आहे त्याला बोलाव त्याचे पाय तोडतो. तो जर माझ्या नादी लागला तर त्याला गाडीने उडुन देईन अशी धमकी दिली आहे. म्हणून माझी अमृत सुरेश उभेदळ रा. सुरेशनगर ता. नेवासा जि. आहिल्यानगर याचेविरुध्द फिर्याद आहे. फिर्यादीवरून नेवासा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 115(२)३५१(२),३५२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे
पुढील तपास पो.हे.कॉ. माने करीत आहेत.

गुन्हा
newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

गुन्हा
गुन्हा

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

गुन्हा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!