घोडेगाव— नेवासा तालुक्यातील गणेशवाडी येथे एका नव विवाहित महीलेचा घर बांधण्यासाठी माहेरून पाच लाख रुपये आणावेत म्हणून छळ करण्यात आल्याची घटना घडली आहे.
या बाबत सविस्तर माहिती अशी की फिर्यादी सानिका विकास तांदळे रा. गणेशवाडी हिस सासरकडील मंडळी घर बांधण्यासाठी तुझ्या वडिलांकडून पाच लाख रुपये वडिलांकडून घेऊन ये ,मि त्यांना माझ्या वडिलांकडे पैसे नसल्याचे सांगितले. त्यांनीच माझ्या लग्नासाठी दुसऱ्यांकडुन उसणे पैसे घेऊन माझे लग्न लावून दिले. असे बोलले असता त्याचा त्यांना राग आल्याने त्यांनी मला शिवीगाळ करून लाथाबुक्यांनी मारहाण करत उपाशीपोटी ठेवून मानसिक व शारीरिक छळ केला. तसेच तुला घरातील कुठलेच काम जमत नाही, उगाच तु माझ्या मुलाच्या गळ्यात पडली तु इथे राहु नकोस जर राहायचे असेल तर सांगितल्या प्रमाणे वडिलांकडून घरासाठी पाच लाख रुपये घेऊन ये. असे म्हणत अंगावरील दागिने काढून घेत घरातून हाकलून दिले असल्याचे नमूद फिर्यादी मध्ये म्हटले आहे. त्या नुसार आरोपी विकास कैलास तांदळे(पती), कैलास सुदाम तांदळे (सासरे), भिमा कैलास तांदळे (सासू) यांच्या विरुद्ध गुन्हा र. नं. ४७/२०२६ बिएन एस चे कलम ८५,११५(२) ३५२,३५१(२)(३), ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल रवींद्र लवांडे हे करत आहेत.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

