महाशिवरात्री
महाशिवरात्री

प्रवरासंगम – नेवासा तालुक्यातील दक्षिणगंगा गोदावरी व प्रवरा या नद्यांच्या संगमावर अनेक महादेवाची मंदिरे आहेत अहिल्यानगर व संभाजीनगर जिल्ह्यातून महाशिवरात्री निमित्त आज दिनांक 15 फेब्रुवारी 2026 रोजी भाविक भक्तांची अलोट गर्दी उसळली होती भाविक भक्तांची सेवा या परिसरातील साई ग्रुप 501 हे करत आहेत आलेल्या सर्व भाविक प्रेमाने खिचडी प्रसादाचे वाटप व त्याचबरोबर पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध केली आहे.

महाशिवरात्री

दक्षिण भारताची पवित्र गंगा गोदावरी व अमृतवाहिनी प्रवरा तसेच गुप्त सरस्वती या नद्यांच्या संगमावर महाशिवरात्र आयोजित केली आहे नद्यांच्या संगमावर श्री सिद्धेश्वर श्री मुक्तेश्वर श्री रामेश्वर श्री गणेशा श्री गौतमेश्वर व श्री संगमेश्वर अशी अनेक महादेवाची मंदिरे आहेत त्याचप्रमाणे नदीकाठावर अनेक घाट आहेत.

महाशिवरात्री

हे अति पवित्र तीर्थक्षेत्र अनादी कालापासून आहे पेशव्यांच्या काळामध्ये येथे सुंदर नक्षीकाम असलेली मंदिरे उभी करण्यात आली आहेत नाना फडणवीस व इतर पेशव्यांचे वास्तव्य व त्यांची भव्यवाडे याची साक्ष देतात. कायगाव हे पेशवे राघोबा दादा यांच्या पत्नी आनंदीबाई यांचे माहेर आहे. आज पहाट पासून दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी उसळली आहे.
टोका व प्रवरा संगम गावचे ग्रामस्थ भक्तगणांचे हार्दिक स्वागत उत्साहाने गतवर्षीप्रमाणे आजही करताना आढळले अशी माहिती डॉक्टर अशोकराव ढगे पाटील यांनी दिली.

newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

महाशिवरात्री
महाशिवरात्री

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

महाशिवरात्री

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!