आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
संजीवन ग्रुप
संजीवन ग्रुप

नेवासा – तालुक्यातील श्रीक्षेत्र देवगड फाटा जवळ दीपज्योत सभागृहात ज्येष्ठ नागरिक संजीवन ग्रुप ची मीटिंग वैचारिक चर्चेने संपन्न झाली. मीटिंग चे अध्यक्षस्थानी ज्येष्ठ प्रा. वाय बी शेख होते. सदस्यांनी ताज्या घडामोडी वर चर्चा केली. प्राध्यापक शिवाजीराव कानडे यांनी प्रास्ताविकात सांगितले की विविध विधायक कामासाठी एकूण संजीवन ग्रुपचे सहा गट तयार करण्यात आले आहेत.

संजीवन ग्रुप

सामाजिक कार्यकर्ते रज्जाक इनामदार यांनी मुंबई येथील कुकाना परळी बेलापूर रेल्वे संदर्भात आंदोलनाची माहिती दिली. कृषी शास्त्रज्ञ डॉक्टर अशोकराव ढगे यांनी कृषी तरंग पुस्तक लिहिल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. आयुक्त तुकाराम मुंढे यांचे कामकाज नियमाला धरून व धडाकेबाज सुरू असल्याबद्दल त्यांना पाठिंबा देऊन सरकारने त्यांची बदली करू नये असा एकमताने ठराव करण्यात आला.

संजीवन ग्रुप

संजीवन ग्रुप चे अध्यक्ष साहेबराव बनगे यांनी ठराव सरकारला सादर केले जातील अशी ग्वाही दिली. सत्काराला उत्तर देताना डॉक्टर ढगे म्हणाले की शेती व शेतकऱ्यांचे प्रश्न केंद्रबिंदू धरून त्यावर उपाययोजना समाजापुढे मांडण्यासाठी आपण कृषी तरंग पुस्तकात विचार मांडले आहेत. प्राचार्य भैय्यासाहेब देशमुख यांनी प्राप्त स्थितीबाबत तात्विक भूमिका मांडली. प्राचार्य अशोक देशमुख, अध्यापक मोटे व रज्जाक इनामदार यांनी गीत व अभंग सादर करून बैठकीला रंगत आणली.

संजीवन ग्रुप

कलाशिक्षक वाबळे यांच्या कुटुंबीयामार्फत सर्वांना सुरुची भोजनाचा आस्वाद देण्यात आला. ज्येष्ठ नागरिक प्राचार्य उपप्राचार्य शिक्षक अधिकारी यांच्या ग्रुप मार्फत सामाजिक बांधिलकीचे उपक्रम नेवासा तालुक्यात राबविण्यात येत आहेत याबद्दल तालुक्यातून उत्तम प्रतिक्रिया उमटत आहेत.

संजीवन ग्रुप
newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

संजीवन ग्रुप
संजीवन ग्रुप
संजीवन ग्रुप

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

संजीवन ग्रुप

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!