
नेवासा – तालुक्यातील गिडेगाव येथील अभ्यासू शेतकरी राजेंद्र साळुंखे यांनी शेवगा भाजीतून चांगला आर्थिक लाभ मिळवला. त्यांच्या शेवगा प्लॉटला कृषी शास्त्रज्ञ डॉक्टर अशोकराव ढगे यांनी भेट दिली व वार्तालाप केला. साळुंखे यांनी सांगितले की सदर हैदराबाद या जातीचे बी सोलापूर वरून आणले. हा शेवगा बुटका असल्यामुळे शेंगा काढण्यास सोपा आहे. दोन ओळीतील अंतर साडेनऊ फूट व दोन रोपातील अंतर सहा फूट ठेवले. सुरुवातीला फक्त शेणखत वापरले.

तदनंतर पाण्यातून ठिबक द्वारे एकरी तीन किलो रासायनिक खते 12 : 61 तसेच झिरो 52:३४ व१९:१९:१९ खते दिली. डॉक्टर ढगे म्हणाले की शेवगा पिकाला कीड व रोग नसल्यामुळे कीटकनाशकाची फवारणी करावी लागत नाही त्यामुळे आरोग्याच्या दृष्टीने शेवगा शेंगा पौष्टिक व आरोग्यदायी आहेत.

उत्पन्नाच्या संदर्भात श्री साळुंखे यांनी माहिती देताना सांगितले की साडेपाच महिन्यातच भरपूर फुले येऊन शेंगा येण्यास सुरुवात झाली जागेवर गिऱ्हाईक येऊन शेंगा घेऊन जातात एकूण एका एकरात 1300 झाडे असून चार टणापर्यंत उत्पादन येईल त्यामुळे एका एकरातून रुपये अडीच लाख उत्पन्न येईल हलक्या मुरमाड जमिनीत हे पीक उत्तम आले आहे.

कृषी शास्त्रज्ञ डॉक्टर अशोकराव ढगे यांनी शेतात जाऊन शेवगा प्लॉटची पाहणी केली व प्रगतशील शेतकरी श्री राजेंद्र साळुंखे यांचे कौतुक केले इतर शेतकऱ्यांनीही तांत्रिक अभ्यास व योग्य नियोजन करून कमी पाण्यात हलक्या जमिनीवर येणाऱ्या शेवगा भाजी पिकाचा अवश्य विचार करावा.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.







