
नेवासा – दि.१६ नेवासा येथील श्री ज्ञानेश्वर महाविद्यालय परिसरात असलेल्या प्रजापिता ब्रम्हाकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय (ओम शांती केंद्र) येथे शिवध्वज पूजन करून विविध अध्यात्मिक कार्यक्रमाने महाशिवरात्री उत्सव साजरा करण्यात आला. विद्यालयाच्या राजयोगिनी सरला दीदींच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी ओम शांती केंद्राच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रम प्रसंगी नगर येथील राजयोगिनी लता दिदी, नेवासा केंद्राच्या वंदना दिदी, नेवासा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश पाटील, माजी नगरसेविका डॉ. निर्मलाताई सांगळे, माजी होमगार्ड समादेशक पत्रकार बाळासाहेब देवखिळे, मुकींदपूर ग्रामपंचायतचे सरपंच सतीशदादा निपुंगे, मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष रावसाहेब घुमरे, इंजिनियर संभाजीराव मते, मेजर कैलास म्हैसमाळे, मुंगसे गुरुजी व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शिव लिंगाचे पूजन करण्यात आले.

चंदन तिलक लावून मान्यवरांचा गुलाबपुष्प देऊन सन्मान करण्यात आला. महाशिवरात्री निमित्ताने उत्सवाच्या प्रमुख ओम शांती केंद्राच्या प्रांगणात उभारण्यात आलेल्या शिवध्वजाचे पूजन व ध्वजारोहण पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना महेश पाटील म्हणाले की आज ओम शांती केंद्राला दिलेल्या भेटीमुळे एक नवी ऊर्जा मिळाल्याचे समाधान मिळाले, केंद्राद्वारे होत असलेल्या प्रबोधन कार्यामुळे अध्यात्मिकता वाढीस लागत असल्याचे त्यांनी सांगितले ओम शांती केंद्राच्या प्रमुख राजयोगिनी वंदना दिदी यांनी स्वागत करून प्रास्ताविक केले.

त्या म्हणाल्या की महाशिवरात्रीच्या निमित्ताने शिव परमात्मा यांचे या धरतीवर दिव्य अवतरण झाले आहे कलियुगाच्या अज्ञान अंधकाराच्या रात्रीमध्ये येऊन ज्ञानाचा प्रकाश शिव परमात्मा देत आहेत. याचीच आठवण म्हणून त्यांची शिवरात्री साजरी केली जाते. या दिवशी आपण उपवास करतो उपवासाच्या दिवशी आपण जास्तीत जास्त ईश्वरचिंतन करण्याचा प्रयत्न करा असा संदेश त्यांनी यावेळी बोलतांना दिला.

यावेळी राजयोगिनी लता दिदींनी महाशिवरात्रीचा महिमा आपल्या प्रवचन सेवेद्वारे विषद केला. यावेळी दुपारच्या सत्रात झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कांचनताई पवार यांनी सत्यम शिवम सुंदरम या गीतावर नृत्य सादर केले. खुशबू कोठारी, अनिता शिंदे, ऋतुजा परदेशी, पंकज कदम, रामचंद्र बर्डे यांनी काढलेल्या सुंदर रांगोळया सर्वांचे आकर्षण ठरले होते. झालेल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जेष्ठ पत्रकार सुधीर चव्हाण यांनी केले तर प्रमिलादिदी क्षीरसागर यांनी आभार मानले. ओम शांती केंद्र साधक परिवारातील भाऊ बहिणी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

