गुन्हा

नेवासा-पैशाच्या कारणावरून शेतकऱ्यावर दगड व लाकडी काठीने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना सोमवारी (१६ फेब्रुवारी) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास इमामपूर घाट (पांढरीपुल) परिसरात घडली. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात मंगळवारी (१७ फेब्रुवारी) सायंकाळी
तिघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अशोक कुंडलीक टकले (वय ४०, रा. पाचुंदा, ता. नेवासा) असे मारहाण झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. आजिनाथ विजय फुलमाळी (रा. शनिशिंगणापूर, ता. नेवासा) व दोन अनोळखी व्यक्ती यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हल्ला

अशोक टकले हे सोमवारी
सायंकाळी अहिल्यानगरवरून आपल्या गावी पाचुंदा येथे जात असताना इमामपूर घाटाजवळील हॉटेल हनुमान येथे आजिनाथ फुलमाळी व त्याच्या दोन अनोळखी साथीदारांनी त्यांना अडवले. पैशाच्या कारणावरून वाद घालत संबंधितांनी टकले यांच्यावर दगड व लाकडी काठीने हल्ला केला. तसेच मारहाण लाथाबुक्क्यांनी करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.

या मारहाणीत टकले जखमी झाले असून त्यांच्यावर जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचार करण्यात आले व त्यानंतर त्यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस अंमलदार मोहमंद शेख करीत आहेत.

Kavya
newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

हल्ला
हल्ला
हल्ला

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

हल्ला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!