आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
शिवजयंती

नेवासा – आजच्या काळात कुणी कुणाला पाच रुपयेही देत नाही, उलट एखाद्याचे दहा रुपये जरी सापडले तरी ते परत न करता अनेकजण बेमान होतात. मात्र अशा परिस्थितीतही माणुसकीचा झेंडा उंचावत समाजाला प्रेरणा देणारे कार्य खडका फाटा येथील हॉटेल व्यवसायिक दिलीप भाऊ वाघ यांनी आज शिवजयंतीच्या दिवशी करून दाखवले.

खडका फाटा येथील संभाजीनगर-पुणे रोडवरील साई ईश्वरी हॉटेल येथे एका लग्नाला जाणारी गाडी चहा-नाश्त्यासाठी थांबली होती. या गाडीतील एका कुटुंबातील महिलेच्या पर्समध्ये जवळपास २० ते २२ लाख रुपयांचे सोन्याचे दागिने होते. चहा-नाश्ता करून गाडी पुढे निघून गेली, मात्र ती पर्स हॉटेलमध्येच राहिली.

ही बाब दिलीप भाऊ वाघ यांच्या लक्षात येताच त्यांनी ती पर्स ताब्यात घेतली. काही वेळाने संबंधित महिलेला पर्स राहिल्याचे लक्षात आल्यानंतर ते सर्व सहकारी घाबरलेल्या अवस्थेत पुन्हा हॉटेलवर परत आले.
त्यावेळी दिलीप भाऊ वाघ यांनी ठाम शब्दांत सांगितले की, “बरं झालं तुम्ही परत आलात, नाहीतर मीच तुमचा शोध घेऊन हे दागिने तुमच्या ताब्यात देणार होतो!”

ही घटना शिवजयंतीच्या दिवशी घडल्याने परिसरात मोठी चर्चा सुरू झाली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना अभिप्रेत असलेली प्रामाणिक, निर्भीड आणि कर्तव्यनिष्ठ रयत आजही समाजात आहे असे उद्गार त्या महिलांनी काढले,
विशेष म्हणजे दिलीप भाऊ वाघ हे मच्छिंद्रनाथ फाउंडेशनचे अध्यक्ष असून, ते नेहमीच गोरगरिबांच्या मदतीसाठी पुढे असतात. त्यांच्या आयुष्यात असे अनेक अनुभव आले असून, मिळालेल्या वस्तू प्रामाणिकपणे परत करून त्यांनी यापूर्वीही समाजासमोर माणुसकीचा आदर्श निर्माण केला आहे.

शिवजयंती

दागिने परत मिळाल्याने त्या कुटुंबाला मनस्वी आनंद झाला. “आजच्या काळातही प्रामाणिक माणूस आहे” हा विश्वास या घटनेमुळे नागरिकांमध्ये पुन्हा निर्माण झाला आहे. शिवजयंतीच्या पवित्र दिवशी घडलेली ही घटना निश्चितच छत्रपती शिवाजी महाराजांना खरी मानवंदना ठरेल, अशी भावना तेथे उपस्थित असलेल्या लोकांनी व्यक्त केली आहे.

newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

शिवजयंती
शिवजयंती
शिवजयंती

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

शिवजयंती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!