आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
अपहरण

नेवासा : देवगड येथे दत्त दर्शनासाठी जाणाऱ्या गंगापूर तालुक्यातील एका ६३ वर्षीय वृद्ध महिला अंगणवाडी सेविकेला लिफ्ट देण्याच्या बहाण्याने कारमध्ये बसवून तिचे अपहरण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आरोपीने दिवसभर कारमध्ये ओलीस ठेवून लोखंडी रॉडने बेदम मारहाण करत चाकूच्या धाकाने ९६ हजार ७०० रुपयांचे सोन्याचे दागिने व रोकड लुटली.

अपहरण

या घटनेने परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून, नेवासा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी गुन्हा दाखल होताच तात्काळ तपासाची सूत्रे हालवून मुख्य आरोपी अशोक भानुदास तांबे (रा. सलाबतपूर, ता. नेवासा) याला तत्काळ अटक केली आहे. ताराबाई रामचंद्र झिंजुर्डे (वय ६३, रा. शिंगी, ता. गंगापूर, जि. छत्रपती संभाजीनगर) या गुरुवारी (दि. ९ जुलै) देवगड फाट्यावर वाहनाची वाट पाहत असताना एका सिल्व्हर रंगाच्या कार चालकाने चला सोडतो म्हणून त्यांना बसवले.

अपहरण

मात्र, कार देवगडकडे न नेता खलालपिंप्री मार्गे नेवासा, नगर, शनिशिंगणापूर, सोनई व ब्राम्हणी परिसरात फिरवली. एका निर्जन रस्त्यावर कार थांबवून आरोपीने लोखंडी रॉडने ताराबाई यांच्या डोक्यावर वार करून गंभीर जखमी केले. त्यानंतर चाकूचा धाक दाखवून ७ ग्रॅमची सोन्याची पोत (किंमत ५६ हजार), ५ ग्रॅमचे झुंबर (किंमत ४० हजार) आणि रोख ७०० रुपये लुटले. तसेच त्यांच्याच साडीने हात-पाय बांधून जिवे मारण्याची धमकी देत रात्री साडेनऊला हायवेवर सोडून दिले.

अपहरण
newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

अपहरण
अपहरण
अपहरण

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

अपहरण

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!