
नेवासा – नेवासे तालुक्यातील पश्चिमेला तसेच राहुरी तालुक्यातील पुर्व भागातील मुळाथडी परीसरातील पानेगांव मांजरी येथे शिवरायांचा पुतळ्याचे पुजन तसेच दर्शनासाठी राहुरी, श्रीरामपूर ,नेवासे तालुक्यातील शिवप्रेमींनी मोठी गर्दी केली होती.अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराजांची ३९६ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
शिवजयंतीच्या पुर्व संध्येला शिवस्मारक समिती तसेच ग्रामस्थांनांनकडून सुशोभीकरण रंगरंगोटी अद्यावत लाईटींग करण्यात आली. सकाळी गोणेगांव रामकृष्ण आश्रमातील हभप भगवान जंगले शास्त्री यांचा हस्ते पुजन शिवरायांची आरती करण्यात आली.

मांजरी येथील चंद्रागिरी महाराज माध्यमिक विद्यालय तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मांजरी, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पानेगांव विद्यार्थ्यांचा वतीने छत्रपती शिवाजी महाराजांचा वेश परिधान व मावळे शिवकालीन देखावे, घोड्यावर मिरवणूक काढण्यात आली.
शिवस्मारक समितीच्यावतीने सोनई करजगांव प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचे अध्यक्ष संजय जंगले, माजी उपसरपंच रामभाऊ जंगले,डॉ जयवंत गुडधे, सतिश जंगले,माजी सरपंच हौशाबापू जंगले,आमराई उद्योग समूहाचे अध्यक्ष सुरज जंगले, उद्योजक सुभाष गुडधे, चैतन्य संस्थेचे अध्यक्ष अनिल जंगले,शिक्षक संघाचे कार्याध्यक्ष संदिप जंगले, डॉ कडूबाळ काकडे,वसंतराव जंगले लक्ष्मीकांत जंगले बाबासाहेब गुडधे संकेत गुडधे,गणेश जंगले, भारत जंगले, आदीं आलेल्या शिवप्रेमींचे स्वागत करुन सन्मान करण्यात आला.यावेळी मांजरी ग्रामपंचायत उपसरपंच कोंडाजी विटनोर, डॉ अमोल विटनोर ,प्रमोद विटनोर,मुळा कारखान्याचे अध्यक्ष नानासाहेब तुवर,नेवासे नगरपंचायत उपनगराध्यक्ष संजय सुखधान, शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख बाळासाहेब पवार, दिगंबर जाधव,कर्णासाहेब जाधव शिरेगांवचे माजी सरपंच किरण जाधव, रत्नाकर बोर्डे,करजगांवचे उपसरपंच सतिश फुलसौंदर, लोकनेते सुनिलभाऊ गडाख पाटील मित्र मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील,राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेवासा तालुकाध्यक्ष अशोक मोरे, अंमळनेर लोकनियुक्त सरपंच ज्ञानेश्वर आयनर,निंभारीचे पोलीस पाटील संतोष पवार, ज्ञानेश्वर संस्थानचे विश्वस्त कैलास जाधव, वांजूळपोई ग्रामपंचायत सरपंच पती गणेश डोंगरे, मुळाथडी पाणी आरक्षण कृती समितीचे संस्थापक उपाध्यक्ष भाऊसाहेब विटनोर, रासपचे जिल्हाप्रमुख नानासाहेब जुंधारे,पानेगांव ग्रामपंचायत सरपंच निकीता भोसले, उपसरपंच बबनराव जंगले, ग्रामविकास अधिकारी गणेश पाखरे, तंटामुक्ती अध्यक्ष उद्धव चिंधे, पोपटराव पाटील संस्थेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर जंगले उपाध्यक्ष दादासाहेब काकडे, संचालक रमेश गुडधे,पानेगांव संस्थेचे संचालक राजेंद्र जंगले,अशोक गागरे मुळाचे संचालक रंगनाथ जंगले, ज्ञानेश्वर जंगले, संजय वाघमारे, भाऊसाहेब वाघमारे, संत कृपा कन्स्ट्रक्शनचे सुरेंद्र जंगले, रविंद्र सोनवणे भाऊसाहेब काकडे, नानासाहेब जंगले,लक्ष्मी स्टीलचे संचालक प्रविण जंगले आदीं सह मान्यवर उपस्थित होते.
लोकनेते सुनिलभाऊ गडाख पाटील मित्र मंडळाच्यावतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

