
सोनई : मुळा एज्युकेशन संस्थेच्या कृषी महाविद्यालय सोनई अंतर्गत पाच दिवसीय कृषीमृदगंध या संकल्पनेवर आधारीत वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. याचाच एक भाग म्हणून क्रीडा महोत्सव घेण्यात येणार आहे. या क्रीडा महोत्सवाचा शुभारंभ संस्थेचे सचिव उत्तमराव लोंढे यांच्या हस्ते झाले. विद्यापीठ आणि ऑल इंडिया निवड झालेल्या खेळाडूंनी मैदानावर क्रीडा ज्योत आणली. यावेळी फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली.

याप्रसंगी सहसचिव डॉ. विनायक देशमुख, प्राचार्य डॉ. हरी मोरे, उपप्राचार्य प्रा. सुनील बोरुडे यांच्या हस्ते क्रीडा ज्योतीचे स्वागत करण्यात आले. प्राचार्य डॉ. हरी मोरे यांनी प्रास्ताविक करून मान्यवरांचे स्वागत केले. क्रीडा अधिकारी डॉ. संदीप तांबे यांनी सूत्रसंचालन केले तर उपप्राचार्य प्रा. सुनील बोरुडे यांनी आभार मानले.

यावेळी मुळा संस्थेचे सचिव उत्तमराव लोंढे म्हणाले, मार्गदर्शक माजी खा. यशवंतराव गडाख यांनी बघितलेले स्वप्न सत्यात उतरत आहे. शेतकऱ्याची मुले आज मोठमोठ्या पदांवर अधिकारी म्हणून काम करीत असल्याचे समाधान आहे. सहसचिव डॉ. विनायक देशमुख म्हणाले, कृषी महाविद्यालय आज शैक्षणिक, क्रीडा तसेच सामाजिक क्षेत्रात नावलौकिक मिळवत आहे. संस्थेच्या दृष्टीने ही अभिमानाची बाब आहे.

यामध्ये प्राचार्य, उपप्राचार्य, क्रीडा शिक्षक, सर्व विभाग प्रमुख आणि प्राध्यापक यांचा मोठा वाटा असल्याचे त्यांनी सांगितले. दि.२३ ते २७ फेब्रुवारी दरम्यान कबड्डी, खो-खो, व्हॉलिबॉल, बॅडमिंटन, क्रिकेट, बास्केटबॉल, टेबल टेनिस, रस्सीखेच आदी स्पर्धा होणार असल्याचे क्रीडा अधिकारी डॉ. संदीप तांबे यांनी सांगितले. सांस्कृतिक स्पर्धेमध्ये प्रामुख्याने पारंपरिक दिवस, बॉलिवूड डे, संगीत खुर्ची, मिस मॅच डे, सांस्कृतिक कार्यक्रम होणार असल्याचे विभाग प्रमुख प्रा. प्रियदर्शनी जाधव यांनी सांगितले. याप्रसंगी महाविद्यालयातील सर्व विभाग प्रमुख आणि प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

