
नेवासा फाटा : अहिल्यानगर जिल्हास्तरीय सांस्कृतिक कार्यक्रम स्पर्धा घाडगेपाटील विद्यालय, नेवासाफाटा या ठिकाणी नुकत्याच पार पडल्या. या स्पर्धेत जिल्ह्यामधील १४ तालुक्यांतील प्रथम क्रमांकाचे संघ सहभागी झाले होते. या संघांच्या अतिशय अटीतटीच्या झालेल्या स्पर्धेत नेवासा तालुक्यातील मुकिंदपूर येथील जि.प. प्राथमिक शाळा कडा कॉलनी येथील लहान गटाच्या संघाने जिल्ह्यात द्वितीय क्रमांक पटकावला.

मुख्याध्यापक जालिंदर वडघणे यांच्या मार्गदर्शनाखाली या संघाने केंद्रस्तर, बीट स्तर आणि तालुका स्तरावर यापूर्वीच यश संपादन केले आहे. इयत्ता तिसरी व चौथीच्या विद्यार्थ्यांना या स्पर्धेच्या तयारीसाठी सीमा कोल्हे व मीनाक्षी अवचरे यांनी विशेष मार्गदर्शन केले. स्पर्धेचे निकष विचारात घेऊन प्रदीप कवडे यांनी संगीताची साथ दिली.

कार्यक्रमातील गोंधळ गीत आणि वासुदेव गीत दत्तात्रय शिंदे यांनी लिहिले होते. स्टेजवरील विशेष बॅकग्राऊंड इफेक्ट शिंदे सरांनी डिझाईन केले होते. स्पर्धकांची वेशभूषा तसेच इतर बाबींसाठी बाबासाहेब मते, अनिता गायकवाड, राणी बोरावके, सविता जाधव, सुनीता देवकर व संगीता डमाळे यांनी विशेष परिश्रम घेतले.

शाळेच्या या अविस्मरणीय यशानंतर केंद्रप्रमुख संजय शेळके, विस्तार अधिकारी रुकसाना शेख व गट शिक्षणाधिकारी संजय कळमकर यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. नेवासा तालुका पंचायत समितीचे गट विकास अधिकारी संजय लखवाल यांनीही विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे विशेष कौतुक केले.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

