शिवजयंती
शिवजयंती

नेवासाफाटा : येथून जवळच असलेल्या श्री ज्ञानेश्वर महाविद्यालया समोरील मराठा पतसंस्थेच्या नेवासा शाखेच्यावतीने हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवजयंती जिजाऊ वंदना गाऊन साजरी करण्यात आली. ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘हर हर महादेव’, ‘जय जिजाऊ जय शिवराय’, अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.

शिवजयंती

यावेळी झालेल्या कार्यक्रमप्रसंगी राजमाता जिजाऊ माँ साहेब, छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन संभाजीराव मते , पी.आर.जाधव, मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष रावसाहेब घुमरे, शारदाताई वांढेकर, छायाताई जगताप, शोभाताई आलवणे, कल्पना वरूडे, राजेश जगताप, दशरथराव मुंगसे, लक्ष्मणराव गारुळे, अॅड. नितीन आडसुरे, शाखाधिकारी संतोष पारखे यांच्याहस्ते करण्यात आले.

शिवजयंती

याप्रसंगी अशोक साळुंके, मुरलीधर मते, दत्तात्रय निपुंगे, बी.के. पवार, रेवणनाथ शेळके, डॉ. संतोष शेळके, श्रीमती माधुरी शेळके, अक्षय देवखिळे यांसह पतसंस्थेचे सभासद, हितचिंतक शिव प्रेमी नागरिक, पतसंस्था कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित शिवप्रेमींना अल्पोपहाराचे वाटप करण्यात आले. सूरज कडू यांनी आभार मानले.

newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

शिवजयंती
शिवजयंती

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

शिवजयंती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!