चांदा : नेवासा तालुक्यातील चांदा येथील खडकवाडी या ठिकाणी श्री संत सावता महाराज व विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त त्रीदिनी अखंड हरिनाम सप्ताहास मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला आहे. या सप्ताहास मंगळवार दि.२४ फेब्रुवारी रोजी प्रारंभ झाला आहे. यामध्ये पुढीलप्रमाणे दैनंदिन कार्यक्रम सुरू आहेत. पहाटे काकडा भजन तसेच माणिक महाराज वाघ यांच्या मधूर वाणीतून संत शिरोमणी सावता महाराज चरित्र सायंकाळी ५ ते ६ हरिपाठ व सायंकाळी ७ ते ९ भागवताचार्य ज्ञानेश्वरीताई गुंजाळ ( शेंडी, ता.नगर) यांचे रात्री कीर्तनसेवा झाली.
तर आज बुधवारी सायंकाळी ७ ते ९ कृष्णाजी महाराज हारदे, माळेवाडी दुमाला श्रीक्षेत्र नेवासा यांचे कीर्तन होईल तसेच उद्या गुरुवार दि. २६ रोजी सायंकाळी ७ ते ९ या वेळेमध्ये रामायणाचार्य देविदास महाराज आडभाई यांचे काल्याचे किर्तन होऊन त्यानंतर भाविकांसाठी महाप्रसाद वाटपाचा कार्यक्रम होईल. तरी चांदा व पंचक्रोशीतील भाविकांनी या धार्मिक कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन सप्ताह कमिटी, खडकवाडी (चांदा) यांच्यावतीने करण्यात आले आहे.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.







