सोनई-रस्तापूर गावाच्या शिवारात मुळा उजवा कॅनॉलच्या पाण्यात आज दुपारी ४.३० वाजण्याच्या सुमारास अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आला. ही घटना मल्हारी जावळे यांच्या शेतालगत घडली आहे.

मृतदेह बेवारस अवस्थेत आढळल्याने ओळख पटविण्याचे आव्हान उभे राहिले आहे. घटनेची माहिती मिळताच शनिशिंगणापूर पोलीस स्टेशन यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून पुढील कार्यवाही सुरू केली आहे. मयत व्यक्तीबाबत कोणाला काही माहिती असल्यास अथवा नातेवाईकांचा शोध लागल्यास तत्काळ शनिशिंगणापूर पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

