आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
बनावट कागदपत्रे

संशयित आरोपी मावस भाऊ ताब्यात; गर्भवती राहिल्याने प्रकार उघडकीस

अल्पवयीन मुलीवर अत्याचार

आपला जिल्हा – शहरातील एका उपनगरात अल्पवयीन मुलीवर मावस भावाने अत्याचार करून तिला गर्भवती केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पीडित अल्पवयीन मुलीने (वय १३) दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात संशयित आरोपी मावस भावाविरूध्द अत्याचार, पोक्सो कलमान्वये गुरुवारी (५ मार्च) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अल्पवयीन मुलीवर अत्याचार

फिर्यादी मुलीची आई चार वर्षांपूर्वी मयत झाली असून वडील मजुरीसाठी बाहेर राहतात. त्यामुळे ती गेल्या चार वर्षांपासून मावशीकडे राहते. दरम्यान, जानेवारी २०२६ मध्ये दुपारी फिर्यादी मुलगी घरी एकटी असताना तिच्या दुसऱ्या मावशीच्या लहान मुलाने तिला त्यांच्या घरी स्वयंपाक करण्यासाठी बोलावले. ती त्यांच्या घरी गेल्यानंतर घरात संशयित आरोपी मावस भाऊ हा
एकटाच होता. मुलगी स्वयंपाक करत असताना संशयिताने मागून येत तिला मिठी मारून जबरदस्तीने जमिनीवर पाडले व तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप आहे.

पीडित मुलीने विरोध केल्यावर संशयित आरोपीने तिला मारहाण केली तसेच हा प्रकार कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे घाबरलेल्या मुलीने हा प्रकार कोणालाही सांगितला नाही. मात्र बुधवारी (४ मार्च) मुलीच्या पोटात दुखू लागल्याने तिने ही बाब मावशीला सांगितली. त्यानंतर तिला उपचारासाठी शहरातील खासगी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले असता ती गर्भवती असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. यानंतर पीडित मुलगी व तिच्या भात्तेवाईकांनी तोफखाना पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दाखल केली.

या प्रकरणी पोलिसांनी मावस संशयित आरोपी भावाविरूध्द गुन्हा दाखल केला असून त्याला ताब्यात घेतले आहे. तो अल्पवयीन असल्याचे पोलिसांनी सांगितले. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक परशुराम दळवी करीत आहेत.

newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

अल्पवयीन मुलीवर अत्याचार
अल्पवयीन मुलीवर अत्याचार
अल्पवयीन मुलीवर अत्याचार

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

अल्पवयीन मुलीवर अत्याचार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!