अत्याचार

आपला जिल्हा-लग्नाचे आमिष दाखवून १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार करणाऱ्या नराधमाला राहाता येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने शुक्रवारी दोषी ठरवत २० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. शाहबाज रियाज अली सय्यद रा. श्रीरामनगर, शिर्डी असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे.

२०२२ मध्ये शिर्डी पोलीस ठाण्यात यासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपी शाहबाज़ याने पीडित मुलीला लग्नाचे प्रलोभन दाखवून तिच्या असहायतेचा फायदा घेतला होता. या अत्याचारामुळे
पीडिता गर्भवती राहिली होती. शिर्डी पोलिसांनी याप्रकरणी भादंवि कलम ३७६ सह पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीला बेड्या ठोकल्या होत्या.

अत्याचार

या खटल्याची सुनावणी राहाता न्यायालयात पार पडली. सरकारी पक्षातर्फे एकूण १४ साक्षीदार तपासण्यात आले. यामध्ये पीडित मुलगी, पंच, फॉरेन्सिक लॅबचा अहवाल आणि तपास अधिकाऱ्यांची साक्ष अत्यंत महत्त्वाची ठरली. पुराव्यांची साखळी आणि सरकारी वकिलांचा प्रबळ युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपीला २० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रणजित गलांडे यांनी प्रभारी अधिकारी म्हणून काम पाहिले, तर तत्कालीन सपोनि दाभाडे यांनी गुन्ह्याचा तपास केला होता.

सरकारी पक्षातर्फे सरकारी अभियोक्ता अॅड. बाबासाहेब पानगव्हाणे यांनी प्रभावी बाजू मांडली. त्यांना मूळ फिर्यादीचे वकील अॅड. व्ही. पी. खिस्ते, कोर्ट पैरवी अधिकारी सुभाष माळी आणि महिला पोलीस कर्मचारी पी. बी. बनकर यांनी सहकार्य केले. या निकालामुळे पीडितेच्या कुटुंबाला न्याय मिळाला आहे.

अत्याचार
newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

अत्याचार
अत्याचार

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

अत्याचार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!