
नेवासा – शहरामध्ये रंगपंचमी उत्सव आनंदात साजरा करण्यात आला. रंगपंचमीच्या निमित्ताने विविध पक्षातील युवक पदाधिकारी एकत्रित आले. हेवेदावे विसरून एकमेकांना रंग लावून नेवासा शहरात रंगपंचमी साजरी करण्यात आली. यावेळी नगराध्यक्ष डॉ. करणसिंह घुले यांना चौकात घेरून विविध पक्षाच्या मित्रांकडून व सामाजिक कार्यकर्त्यांनी त्यांना रंगवले.

रंगपंचमी निमित्त चौकाचौकात तरुणांनी फिरून आपल्या ओळखीच्या मित्राला घेरून त्यास रंगवले. नेवासा शहरातील प्रत्येक चौकाचौकात युवकांकडून रंगपंचमीचा जल्लोष करण्यात आला. एकमेकांना रंगविलेले युवकांचे चेहरे पहाण्यासारखे होते. कुणीच कोणाला ओळख देखील येत नव्हते असे चित्र पहावयास मिळाले. होली के दिन, दिन खिल जाते है, रंगोमे रंग मिल जाते है, गिले शिकवे भूलकर कर दोस्तो, दुष्मन भी गले मिल जाते हैं…

या शोले चित्रपटातील गाण्याची आठवण यावेळी झाली कारण सर्व मतभेद हेवेदावे विसरून रंगपंचमी सण साजरा करण्यात आला. निवडणूकीत आमने सामने असलेले युवा कार्यकर्ते सर्व मतभेद विसरून एकमेकांना रंग लावून आनंदोत्सव साजरा करतांना दिसत होते राष्ट्रीय ऐक्य निर्माण करणारे अनेक सण आपल्या देशात साजरे होतात इतरांना आपल्या संस्कृतीचा हेवा वाटतो त्याच पैकी राष्ट्रीय ऐक्य निर्माण करणारा रंगपंचमी सण नेवासा शहरात उत्साहपूर्ण वातावरणात साजरा होत असल्याबद्दल नगराध्यक्ष डॉ. करणसिंह घुले यांनी समाधान व्यक्त केले यावेळी झालेल्या रंगपंचमी उत्सवात नगरसेवक राजू काळे, जालिंदर गवळी, कृष्णा परदेशी, धनूभाऊ काळे, भाजपचे शहराध्यक्ष मनोज पारखे, धनूभाऊ काशीद, सतीश चक्रनारायण , अजित नरुला, महेश पडूरे, गणेश गाडवे, अमोल पिटेकर, प्रेस क्लबचे मोहन गायकवाड, शंकर नाबदे, आकाश कडु यांच्यासह विविध संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

