नेवासा : शहरामध्ये शिवसेना प्रणित धर्मवीर आण्णाभाऊ लष्करे प्रतिष्ठानच्या वतीने शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली यानिमित्ताने काढण्यात आलेल्या मिरवणूकीत शिव प्रतिमा मिरवणुकीचे चौकाचौकात तोफांच्या सलामीने उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. जय भवानी जय शिवाजी असा जयघोष करत भगवे ध्वज हातात घेऊन शिव प्रेमींनी जल्लोष केला. छत्रपती शिवरायांच्या नामघोषाने नेवासेनगरी दुमदुमली होती.

शिवजयंती निमित्त नेवासा येथील मळगंगा देवी मंदिरापासून शिव प्रतिमा मिरवणुकीस प्रारंभकरण्यात आला. विद्युत रोषणाईने सजविण्यात आलेल्या रथामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ठेवण्यात आला होता. यावेळी शिर्डी लोकसभा मतदार संघाचे शिवसेनेचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे, उद्योजक प्रभाकर शिंदे, नगराध्यक्ष डॉ. करणसिंह घुले, पोलीस निरीक्षक महेश पाटील, नगरपंचायत अधिकारी सागर झावरे, लष्करे प्रतिष्ठानचे प्रमुख बिट्टू लष्करे, शिवसेना शिवसहकार सेनेचे राज्य उपप्रमुख बालेंद्र पोतदार, अँड. संजय सुखदान, धनू काळे, शिवसेना शहरप्रमुख नितीन जगताप, उपप्रमुख मुन्ना चक्रनारायण, पप्पू परदेशी, कृष्णा परदेशी, सार्थक परदेशी, अंबादास लष्करे, माजी सरपंच सतीश गायके यांच्या हस्ते शिव प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

सदरच्या मिरवणुकीत फटाक्यांची आतषबाजी करत तोफांची सलामी देत छत्रपती शिवरायांना मानवंदना देण्यात आली. यावेळी मिरवणूक रथावर विद्युत रोषणाई सर्वांचे आकर्षण ठरली होती. शिवजयंती मिरवणुकीत युवक शिवप्रेमीची संख्या मोठ्या प्रमाणात होती. यावेळी आठ वर्षीय बालिका कु.संचिता गणेश देवढे हिने छत्रपती शिवाजी महाराजांचा शौर्य पोवाडा व शिवगर्जना सादर करून उपस्थितांची मने जिंकली. शिवजयंती मिरवणूकीचा समारोप ग्रामदैवत श्री मोहिनीराज मंदिरात करण्यात आला. सदरची मिरवणूक शांततेत व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.







