सत्कार

माका –येथे प्राध्यापक राजेंद्र बाजीराव पालवे सर यांचा भव्य नागरी सत्कार सोहळा पार पडला.
माका गावचे भूमिपुत्र श्री राजेंद्र बाजीराव पालवे सर हे सुधागड विद्यासंकुल कळंबोली नवी मुंबई या ठिकाणी कार्यरत असून त्यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल महाराष्ट्र शासनाचा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षक पुरस्कार तसेच सकाळ माध्यम समूहा तर्फे दिला जाणारा अत्यंत मानाचा समजला जाणारा सकाळ सन्मान हा 2026 या वर्षाचा पुरस्कार मिळाल्याबद्दल समस्त ग्रामस्थ माका व श्री अनिल रघुनाथराव घुले मित्र परिवार यांच्या वतीने सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता.

सत्कार

याप्रसंगी श्री राजेंद्र पालवे सर यांचा व ह भ प श्री जगन्नाथ महाराज शास्त्री जगदंबा गड मोहटे यांचा माका ग्रामस्थांच्या वतीने श्री शिरुभाऊ लोंढे तसेच मल्हारी भाऊ आखाडे व डॉक्टर रघुनाथ पागिरे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.याप्रसंगी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री ज्ञानदेव सानप सर यांनी केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक युवानेते तथा उपसरपंच श्री अनिल रघुनाथराव घुले यांनी केले याप्रसंगी अनेक मान्यवरांनी मनोगत व्यक्त करून श्री पालवे सर यांना शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाच्या शेवटी श्री अमोल पालवे ग्रामपंचायत सदस्य माका यांनी आभार मानले त्यानंतर पसायदानाने कार्यक्रमाचा समारोप झाला.आलेल्या पाहुण्यांची स्नेहभोजनाची व्यवस्था अनिल दादा घुले मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आली होती

सत्कार
newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

सत्कार
सत्कार

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

सत्कार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!