लंघे

नेवासा- राज्य सरकार जनतेच्या कल्याणसाठी मोठे लोकाभिमुख निर्णय घेत असताना त्याचा फायदाही शेवटच्या घटकांपर्यंत होणे गरजेचे आहे. शासन दरबारी आलेल्या सर्वसामान्य माणसाचे काम लवकरात लवकर झाले पाहिजे. आपण आता येथून पुढे चांगले काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचे स्वागत करू आणि चुकीचे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांची मात्र थेट उचलबांगडी करू, असा इशारा आ. विठ्ठलराव लंघे यांनी दिला.

लंघे

नेवासे जी.के. मंगल फाटा येथील कार्यालयात
आयोजित शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे उद्घाटन आमदार लंघे यांच्याहस्ते करण्यात करा आले. यावेळी ते बोलत होते. भूसंपादन विभागाचे उपजिल्हाधिकारी सुभाष दळवी, तहसीलदार डॉ. संजय बिरादार,तालुका कृषी विभागाचे धनंजय हिरवे, भूमी अभिलेखचे संदीप गोसावी, भानसहिवरे मंडलधिकारी सरिता मुंढे, भाजपाचे नेते अंकुश काळे, माजी उपसभापती किशोर जोजार, प्रताप चिंधे, दादा निपुंगे, धरणग्रस्त कृती समितीचे दिगंबर आवारे आदी उपस्थित होते.

लंघे

उपजिल्हाधिकारी दळवी म्हणाले, कामात दिरंगाई आणि चुकीचे काम करणाऱ्या कोणाची खैर करणार नसल्याचे सांगून जनतेची कामे वेळेत करून मार्गी लावण्याचे आदेश दिले. तहसीलदार डॉ. संजय बिरादार यांनी कार्यक्रमाची रूपरेषा स्पष्ट केली. प्रास्ताविक मंडलाधिकारी सरिता मुंडे यांनी केले. शिबीर यशस्वीतेसाठी तलाठी आकाश जोशी, श्वेता काळे, निलेश साळुंखे, सोमनाथ गलांडे, अशोक गाडेकर, रमेश रिंधे यांच्यासह कर्मचारी यांनी प्रयत्न केले.

लंघे
newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

लंघे
लंघे

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

लंघे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!