नेवासा-तालुक्यातील खेडले परमानंद येथे शालेय विद्यार्थ्यांचा अपघात झाला असून सुदैवाने विद्यार्थी वाचला त्याच्या हाताला , पायाला , डोक्याला जखमा झालेल्या असून किरकोळ स्वरूपात रक्तस्राव झाला.
याबाबतचा सविस्तर वृत्तांत असा आहे की महात्मा गांधी माध्यमिक विद्यालय शेगाव खेडले परमानंद या ठिकाणी परिसरातील अनेक विद्यार्थी शिक्षण घेतात.

विद्यार्थ्यांना शाळेकडे जाण्याचा मार्ग व या मार्गावर दोन ते तीन ठिकाणी अपघाती वळण आहेत आणि या वळणावर अतिक्रमाच्या हेतूने झाडे लावण्यात आलेले असल्यामुळे वारंवार विद्यार्थ्यांचे व नागरिकांचे अपघात होत आहे.या वळणावर असलेल्या झाडांमुळे व आसपासच्या अतिक्रमणामुळे समोरून आलेले वाहन विद्यार्थ्यांना व वाहन चालकांना दिसत नसल्यामुळे अपघातांची मालिका या ठिकाणी सुरूच आहे.

संबंधितांना यासंदर्भात वेळोवेळी सूचना करूनही अतिक्रमण काढण्यात येत नाही त्यामुळे हा मोठा चिंतेचा विषय झालेला आहे.
या संदर्भात नेवासा तहसीलदार , सोनई पोलीस प्रशासन व ग्रामपंचायत यांनी तातडीने लक्ष घालून हा विषय मार्गी लावावा अशी ग्रामस्थांच्या वतीने मागणी करण्यात येत आहे.
संबंधित विषयाबाबत जिल्हाधिकारी पंकज आशिया , नेवासा तहसीलदार संजय बिरादार ,मंडल अधिकारी,सोनई पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांना माहिती देण्यात आलेली आहे.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.






