नेवासा-उन्हाळ्याची तीव्रता लक्षात घेता राजेंद्र पोतदार कुटुंबीयांनी नेवासा शहर व परिसरातील नागरिकांसाठी सुरू केलेल्या पाणपोई द्वारे श्री मोहिनीराज व संत ज्ञानेश्वर महाराजांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची व नेवासा शहरात कामासाठी येणाऱ्या तहानलेल्या नागरिकांची तहान निश्चितच भागणार असून पाणपोई सुरू करून पोतदार परिवाराने ईश्वरी कार्य केले आहे असे प्रतिपादन भाजप नेते अनिल पा. ताके यांनी व्यक्त केले.

नेवासा नगरपंचायत जवळ नेवासा तालुका खरेदी विक्री संघाचे संचालक राजेंद्र पोतदार यांनी आपले पिताश्री व नेवासा शहराचे माजी सरपंच कै. रामकृष्ण पोतदार यांचे स्मरणार्थ दरवर्षी पाणपोई सुरू करून थकलेल्या भाजलेल्या जीवांची तहान भागवत असतात यावर्षी देखील राजेंद्र पोतदार यांनी कै रामकृष्ण पोतदार यांचे स्मरणार्थ पाणपोई सुरू केली या पाणपोईचे उद्घाटन भाजप नेते अनिल पा. ताके यांचे हस्ते झाले यावेळी ते बोलत होते.

यावेळी अनिल पा. ताके पुढे म्हणाले की सालाबादप्रमाणे यंदाही माजी सरपंच कै रामभाऊ पोतदार सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने हंगामी पाणपोई सुरू करण्यात आली.युवा नेते राजेंद्र पोतदार यांच्या संकल्पनेतून नेहमीच विविध सामाजिक उपक्रम राबवली जातात. उन्हाळ्यात वाटसरूनां पाण्याची गरज ओळखून हंगामी पाणपोई सुरू करण्यात आली पोतदार परीवारचा नेवासा शहराच्या जडणघडणीत मोलाचे योगदान राहिले आहे हाच वारसा राजेंद्र पोतदार यांनी चालु ठेवला आहे .
यावेळी नेवासा नगरपंचायत चे नगररचना अधिकारी श्री राहुल शहाणे,नगरसेवक कृष्णा परदेशी , सुधीर बोरकर सर,उत्तम वाघमारे,राहुल देहदाराय, सचिन भोपळे आदी उपस्थित होते.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.






