आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
शिंगणापुर

शनिशिंगणापूर-शनिवार आणि रविवार अशा दोन दिवसांच्या सुट्ट्या असूनही, पारा ३४ अंश सेल्सिअसवर गेल्याने शनिशिंगणापुरात सध्या शुकशुकाट पाहायला मिळत आहे. वाढत्या तापमानामुळे भाविकांची गर्दी कमी झाल्याने स्थानिक व्यावसायिकांचे आर्थिक गणित कोलमडत आहे. दुसरीकडे गावातील अनधिकृत पार्किंग आणि लटकूंचा त्रास पुन्हा सुरु झाला आहे.

शिंगणापुर

सध्या उन्हाची तीव्रता प्रचंड वाढली असून सकाळी १० वाजेनंतर शिंगणापूरच्या रस्त्यांवर शुकशुकाट पसरतो. सकाळी १० वाजेपर्यंत दर्शनासाठी येणारे भाविक अकराच्या सुमारास गायब होतात. तापमानाचा पारा ३५ अंशांवर गेल्याने आणि सायंकाळी साडेसहा वाजताही तापमान ३४ अंशांवर राहत असल्याने भाविक उन्हाळा संपल्यानंतरच दर्शनाला येण्यास पसंती देत आहेत. मे महिना अद्याप बाकी असल्याने पुढील काळात परिस्थिती अधिक गंभीर होण्याची भीती व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे.

शिंगणापुर

श्रद्धेच्या नावाखाली लूट

शिंगणापुरात येणाऱ्या भाविकांना दर्शनापेक्षा पार्किंग आणि लॉजिंगच्या नावाखाली होणाऱ्या लुटीचा सामना करावा लागत आहे. विशेषतः पार्किंग माफियांची दहशत मोडून काढणे हे पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे.

व्यावसायिकांपुढे पेच

दिवसभर बसूनही बोहणी होत नाही. दुकान भाडे आणि दैनंदिन खर्च निघणेही कठीण झाले आहे. त्यातच उन्हामुळे स्थानिकांनीही घराबाहेर पडणे बंद केले आहे. मे महिन्यातील परिस्थितीचा विचार करून आताच धडकी भरत आहे, अशी खंत येथील गाळेधारक गुड्डू बेल्हेकर यांनी व्यक्त केली आहे.

शिंगणापुर
newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

शिंगणापुर
शिंगणापुर

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

शिंगणापुर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!