नेवासा-अहिल्यानगर जिल्ह्यातील दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांना सहाय्य व आवश्यक उपकरणे उपलब्ध करून देण्यासाठी विशेष शिबिर आयोजित करण्याबाबत केंद्र सरकारकडून सकारात्मक पाऊल उचलण्यात आले आहे. यासंदर्भात सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्री डॉ. वीरेंद्र कुमार यांनी खा. भाऊसाहेब वाकचौरे यांना पत्र पाठवून माहिती दिली आहे.
खा. वाकचौरे यांनी २२ डिसेंबर २० २५ रोजी केलेल्या पाठपुराव्याचा संदर्भ घेत केंद्रीयमंत्री वीरेंद्र कुमार
यांनी सांगितले की, राष्ट्रीय वयोश्री योजना (आरव्हीवाय) अंतर्गत अहिल्यानगर जिल्ह्यात शिबीर आयोजित करण्याबाबत प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या उपक्रमातून पात्र लाभार्थ्यांना आवश्यक ते सहाय्यक उपकरणे उपलब्ध करून दिली जाणार आहेत. यासोबतच लाभार्थ्यांना त्यांच्या जवळच्या प्रधानमंत्री दिव्याशा वयोश्री केंद्रामार्फत ‘वॉक-इन’ पद्धतीनेही लाभ घेता येणार आहे. जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, वडगाव गुप्ता येथे हे केंद्र कार्यरत असून इच्छुकांनी येथे संपर्क साधावा.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.







