माका:- नेवासा तालुक्यातील माका येथील दक्षिण मुखी हनुमान मंदिराच्या भव्य प्रांगणामध्ये सालाबादप्रमाणे श्रीराम नवमी व हनुमान जयंती निमित्त अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा गुरवार दिनांक 26/3/2026 ते शुक्रवार दिनांक 3/4/2026 या कालखंडामध्ये वै.ह भ प परम पूज्य गुरुवर्य रघुनाथ महाराज उंबरेकर यांच्या कृपाआशिर्वादाने व ह भ प शांतीब्रह भास्करगिरी महाराज श्री क्षेत्र देवगड यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली संपन्न होत आहे.गुरु वार दिनांक 26/3/2026 रोजी 9 ते 12 यावेळा हनुमान मंदिरामध्ये भव्य दिव्य श्रीराम जन्मोत्सव सोहळा संपन्न होऊन सप्ताहास सुरुवात होत आहे.

सप्ताहामध्ये दररोज सकाळी 4 ते 6 काकडा भजन,9 ते 11 ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा,4 ते 5 प्रवचन ,5 ते 6 हरिपाठ , सायंकाळी 7 ते 9 हरिकीर्तन व नंतर दररोज महाप्रसाद होईल .त्यामध्ये गुरु वार दिनांक 17/4/2024 ह भ प महेश महाराज मडके श्री क्षेत्र देवाची आळंदी ; गुरूवार दिनांक 26/3/2026 रोजी ह भ प कल्याण महाराज शिंदे, शुक्रवार दिनांक 27/3/2026 रोजी ह भ प बाबासाहेब महाराज गडकर, शनिवार दिनांक 28/3/2026 रोजी ह भ प मोहन महाराज दहिफळे, रविवार दिनांक 29 /3 /2026 रोजी ह भ प पुंडलिक महाराज जंगले शास्त्री , सोमवार दिनांक 30/3/2016 रोजी ह भ प तुकाराम महाराज केसभट, मंगळवार दिनांक 31/ 3 /2026 रोजी ह भ प श्रीकांतगिरी महाराज शास्त्री ,

बुधवार दिनांक 1/4/ 2026 रोजी ह भ प रामायणाचार्य हनुमंत जी महाराज शास्त्री, गुरुवार दिनांक 2/ 4 /2026 रोजी ह भ प जगन्नाथ महाराज शास्त्री यांचे यांचे जाहीर हरी किर्तन सेवा होईल. व शुक्रवार दिनांक 3/4/2026रोजी सकाळी 9 ते 11 ह भ प भागवत महाराज उंबरेकर श्री क्षेत्र वृध्देश्र्वर संस्थान यांचे सुश्राव्य काल्याचे किर्तन होईल व त्यानंतर महाप्रसादाने पगंत होईल .तरी यांची पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्तांनी या भक्तीज्ञानगंगेच्या प्रेमप्रवाहात सहभागी होऊन ज्ञानामृत व संत सेवेचा लाभ घ्यावा अशी विनंती श्री आदिनाथ भजनी मंडळ , वामन भाऊ भजनी मंडळ व समस्थ ग्रामस्थ माका ता.नेवासा यांच्या कडुन करण्यात येत आहे

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.







