नेवासा – येथील सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या अमरनाथ ग्रुपच्या वतीने ज्येष्ठ विधीतज्ज्ञ स्व. गोरक्षनाथ काकडे यांची कन्या कु. प्राजक्ता काकडे हिचा सत्कार करण्यात आला. CA परीक्षेत तिने मिळवलेल्या देदीप्यमान यशाबद्दल ग्रुपच्या वतीने तिला सन्मानित करून तिच्या जिद्द व चिकाटीचे कौतुक करण्यात आले.

या गौरव सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी अमरनाथ ग्रुपचे मार्गदर्शक व कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नंदकुमार पाटील होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला संयोजक रामनाथ जाधव, शंकरराव ओहोळ, योगेश रासने व शंभूराजे जंगले पाटील यांनी मान्यवरांचे स्वागत केले. शिक्षण विभागाचे माजी अधिकारी त्रिंबकराव गायकवाड यांनी ग्रुपच्या वतीने राबविल्या जाणाऱ्या सामाजिक व शैक्षणिक उपक्रमांची माहिती दिली. कु. प्राजक्ता काकडे हिचा सन्मान तिची आई तथा चिंचबनच्या सरपंच मीनाक्षी काकडे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला.

यावेळी सभापती नंदकुमार पाटील, सौ. शुभांगीताई पाटील, सौ. वैशालीताई ओहोळ, शिवसहकार सेनेचे राज्य उपप्रमुख बालेंद्र पोतदार, युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीचे विकास अधिकारी किशोर गारुळे व व्यापारी शशिकांत नळकांडे यांनी मनोगत व्यक्त करत प्राजक्ताला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

या सोहळ्यास अमरनाथ ग्रुपचे ज्येष्ठ मार्गदर्शक रवींद्र जोशी, उद्योजक भाऊसाहेब अंबाडे, राजेंद्र उंदरे, मेजर अरुण धनक, राजेंद्र महाजन, बँक मॅनेजर दिलीप जगदाळे, मूर्तिकार बजरंग ईरले, ज्ञानेश्वर उगले, अंबादास ईरले, नगरसेवक जालिंदर गवळी, गणेश चौव्हान, सुरेश शिंदे, ॲड. अभिजित पाटील,पत्रकार सुधीर चव्हाण यांच्यासह अमरनाथ ग्रुपचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

“वडिलांनी पाहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी जिद्दीने अभ्यास केला.आई आणि बहिणीने सावलीप्रमाणे साथ दिली, तर सर्व नातेवाईक व आप्तेष्टांनी वेळोवेळी दिलेल्या प्रोत्साहन आणि प्रेरणेमुळेच मी हे कठीण शिखर सर करू शकले. हे यश मी माझ्या वडिलांच्या स्मृतींना समर्पित करते.”
— कु. प्राजक्ता काकडे (CA)

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.







