
करजगाव – नेवासा तालुक्यातील अंमळनेर येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त आयोजित हिंदू संमेलन उत्सहात संपन्न झाले.

देव, देश आणि धर्माचे कार्य प्रत्येक हिंदू बांधवांमध्ये रुजणे आवश्यक आहे. आपल्यातील जात, पंथ आणि अविचाराचा भेद बाजूला सारून देश व धर्मकार्याला अग्रक्रम देण्याची गरज आहे. देशाला आपले कुटुंब माणुन सर्व बांधवांनी एकत्र राहण्याची गरज असल्याचे अँड. इशानजी श्रीराम गुणपुले यांनी सांगितले .
ते अंमळनेर ता नेवासा येथे आयोजित हिंदू संमेलन प्रसंगी मार्गदर्शन करताना बोलत होते.

हिंदु समाजाने सर्वांना सामावुन घेतले आहे. कधीही स्वतःचा विचार केला नाही.हिंदु समाजावर अनेक आक्रमण होत असुन अनेकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.यामुळे सर्वांनी सक्षम व सावध भुमिका घेण्याची गरज असल्याचे नवनाथ महाराज म्हस्के यांनी सांगितले.
संमेलनांच्या माध्यमातून प्रबोधन, जनजागृती व संघटनाकरिता प्रयत्न केले जाणार आहे.
हिंदू धर्म, परंपरा, संस्कृती आणि मुल्यांचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी भव्य हिंदू संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.शरिर व मनाच्या विकासासाठी योग,सूर्यनमस्कार, आदींचे प्रशिक्षण दिले जात असल्याचे आयोजकांनी सांगितले. प्रास्ताविक रोहित नळकांडे यांनी केले.
यावेळी करजगाव, अंमळनेर, निंभारी, पानेगाव, शिरेगाव, खेडले परमानंद सह करजगाव मंडलातील सकल हिंदू समाजातील बांधव , भगिनी, तसेच हिंदु संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.







