आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
गडाख

सोनई – घोडेगाव येथील जनावरांच्या बाजारात आज कृषी उत्पन्न बाजार समितीचे मार्गदर्शक व माजी मंत्री शंकरराव गडाख पाटील यांनी भेट देत अलीकडे पूर्ण झालेल्या विकास कामांची प्रत्यक्ष पाहणी केली.

यावेळी त्यांनी बाजार परिसरातील विविध भागांना भेट देत म्हैस, गाय व्यापारी तसेच शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला. भर उन्हात संपूर्ण बाजारतळावर फिरून त्यांनी कामांची पाहणी केली व प्रत्यक्ष परिस्थितीचा आढावा घेतला.

गडाख

माजी मंत्री गडाख यांनी व्यापारी, शेतकरी व व्यावसायिक यांच्याशी चर्चा करत त्यांच्या अडचणी व समस्या समजून घेतल्या. तसेच भविष्यातील सुधारणा व आवश्यक सुविधा याबाबतही सूचना घेतल्या.
यावेळी उपस्थित व्यापाऱ्यांनी बाजारात करण्यात आलेल्या काँक्रेटिकरण, रस्ते, ड्रेनेज, वृक्षारोपण व इतर सुविधांबद्दल समाधान व्यक्त करत माजी मंत्री शंकरराव गडाख यांचा सन्मान करून आभार मानले.

गडाख

“माजी मंत्री शंकरराव गडाख यांनी भर उन्हात संपूर्ण बाजारतळाची पाहणी करून व्यापारी व शेतकऱ्यांची आपुलकीने विचारपूस केली. त्यांच्या या प्रत्यक्ष भेटीमुळे सर्वांमध्ये आत्मीयता व विश्वासाची भावना निर्माण झाली आहे. पूर्ण झालेल्या दर्जेदार कामांबद्दल सर्वांनी समाधान व्यक्त करत माजी मंत्री शंकरराव गडाख यांचे मनापासून आभार मानले.”

गडाख

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

गडाख
गडाख

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

गडाख

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!