शनिशिंगणापूर – शनिशिंगणापूर येथील गावकरी गेट खुले करण्याची अनेक दिवसांची मागणी होती. गावकऱ्यांकडून सातत्याने याचा पाठपुरावा सुरू होता. शनैश्वर देवस्थानचे प्रशासक व विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी मान्यता दिल्याने पहाटे चार ते संध्याकाळी दहा वाजेपर्यंत गावकरी गेट खुले राहणार आहे. शनिशिंगणापूर ग्रामस्थांच्यावतीने या निर्णयाचे स्वागत केले आहे.
यापूर्वी देवस्थान विश्वस्त मंडळाने पहाटे चार वाजल्यापासून ते नऊ वाजेपर्यंत तर सायंकाळच्या आरतीच्या वेळेस एक तास गावकरी गेट खुले करण्यास परवानगी दिली होती. दरम्यान, शनैश्वर देवस्थानचा कारभार विभागीय आयुक्तांकडे गेल्यानंतर गावकरी गेट बंद करण्यात आले होते.

याबाबत शनिशिंगणापूर ग्रामपंचायतचे माजी सरपंच बाळासाहेब बानकर व ग्रामस्थांनी गावकरी गेट खुले करण्याबाबत सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला होता. अखेर विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम व शनैश्वर देवस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी अतुल चोरमारे यांनी याबाबत चर्चा केल्यानंतर देवस्थानचे सुरक्षा अधिकारी गोरख दरंदले यांना परवानगीचे पत्र दिले. गावकरी गेट उघडण्यात आल्यानंतर गावकऱ्यांनी आनंद व्यक्त केला.
देवस्थान प्रशासनाने सुरक्षा विभागाला दिलेल्या पत्रामध्ये आधार कार्डची ओळख तपासून शनिशिंगणापूर येथील रहिवासी असलेल्या भक्तांना प्रवेश द्यावा, असे नमूद केले आहे. सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक ती खबरदारी घेण्यात यावी, त्याचबरोबर मंदिरातील दर्शन बंद होताच गावकरी गेट बंद करून आवश्यक ती सुरक्षा तेथे तैनात करण्यात यावी, असे सुरक्षा विभागाला दिलेल्या पत्रामध्ये म्हटले आहे. गावकरी गेट खुले झाल्याने. ग्रामस्थांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.







