नेवासा : जायकवाडी प्रकल्पांतर्गत नेवासा तालुक्यातील २६ पुनर्वसित गावठाणांमध्ये नागरी सुविधांसाठी ५१ कोटी रुपयांच्या कामांना प्रशासकीय मंजुरी मिळाल्याची माहिती आमदार विठ्ठलराव लंघे यांनी दिली.
जायकवाडी प्रकल्पामुळे विस्थापित झालेल्या नेवासा मतदारसंघातील अनेक गावांचे पुनर्वसन करण्यात आले. विशेषतः गोदाकाठच्या गावांमध्ये रस्त्यांची अवस्था दयनीयहोती. वेळेवर संपर्क साधता न आल्याने गावकऱ्यांना मूलभूत गरजांसाठी मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते. त्यामुळे प्रकल्पांतर्गत पुनर्वसित गावांसाठी रस्त्यांची सोय होणे अत्यंत आवश्यक होते.

विधिमंडळाच्या अधिवेशनात आमदार लंघे यांनी या गावांना नागरी सुविधांचा प्रश्न उपस्थित केला. शासनाने पुनर्वसित गावांचा आराखडा तयार केला; मात्र, १९७६ पूर्वीच्या पाटबंधारे प्रकल्पासाठी पुनर्वसन अधिनियम अस्तित्वात नसल्याचे कारण देत हा प्रस्ताव फेटाळला होता. त्यानंतर आमदार लंघे यांनी तत्कालिन अर्थमंत्री
व उपमुख्यमंत्री स्व. अजित पवार यांची भेट घेऊन मांडली. निर्देशानंतर वस्तुस्थिती त्यांच्या १९७६ पूर्वीच्या गावांचाही या आराखड्यात समावेश करून निधी देण्यासाठी आर्थिक तरतूद करण्याचा अध्यादेश काढण्यात आला.या कामांची प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण झाली असून येत्या काही दिवसांत कामांना सुरुवात होणार असल्याची माहिती आमदार लंघे यांनी दिली.

यामध्ये पोहोच रस्ते, खडीकरण, डांबरीकरण, तसेच ग्रामपंचायत कार्यालयांसारख्या नागरी सुविधांचा समावेश आहे.
पुनर्वसित गावांमध्ये नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी निधी मंजूर केल्याबद्दल त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, तसेच पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे आभार मानले.
दरम्यान, आमदार लंघे यांचे वडील माजी आमदार स्व. वकीलराव लंघे यांनी जायकवाडी धरणग्रस्तांसाठी मोठा लढा उभारला होता. महाराष्ट्रात पुनर्वसनाचा कायदा होण्यासाठी त्यांच्या लढ्याचे मोठे योगदान मानले जाते. गेल्या ५० वर्षांपासून प्रलंबित धरणग्रस्तांच्या प्रश्नांकडे पुन्हा एकदा आमदार लंघे यांनी लक्ष घालून निधी मिळवून दिला.

ही आहेत पुनर्वसित गावे
बहिरवाडी, फत्तेपूर, प्रवरासंगम, खलाल पिंप्री, बकू पिंपळगाव, मंगळापूर, खेडले काजळी, तरवडी, उस्थळ दुमाला, भालगाव, धामोरी, गळनिंब, गोपाळपूर, रामडोह खामगाव, सुरेगाव (गंगा), जैनपूर, सुरेगाव दही, खामगाव नंबर ३, वरखेड, खामगाव नंबर २, उस्थळ खालसा, बेलपांढरी, खामगाव नंबर १, बोरगाव, गोधेगावचा पुनर्वसित गावामंध्ये समावेश आहे.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.







