आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
रोड रॉबरी
रोड रॉबरी

घोडेगाव, दि. ९ – खरवंडी शिवारात भाजीपाला व्यापाऱ्यावर हल्ला करून रोख रक्कम लुटल्याच्या रोड रॉबरी प्रकरणाचा शनिशिंगणापूर पोलिसांनी छडा लावला असून, या प्रकरणातील तीन अनोळखी आरोपींना अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली असून, पोलिसांनी त्यांचे कोठडीचे अधिकार राखून ठेवले आहेत.

पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मच्छिंद्र रामराव डिघोळे (रा. निंभोरा, ता. कन्नड, जि. छत्रपती संभाजीनगर) हे त्यांच्या परिसरातील भाजीपाला पुणे येथे विक्री करून परत कन्नडकडे निघाले होते.

रोड रॉबरी

दि. ३० मार्च २०२६ रोजी दुपारी साडेचारच्या सुमारास, ते खरवंडी गावच्या शिवारात हॉटेल श्रेयससमोर, अहिल्यानगर–छत्रपती संभाजीनगर महामार्गावरून जात असताना, अनोळखी तिघा आरोपींनी त्यांच्या चारचाकी वाहनाला आडवे वाहन लावून अडवले.

आरोपींनी डिघोळे व त्यांच्या चालकाला दमदाटी करत शिवीगाळ केली. त्यानंतर लोखंडी पाईपने मारहाण करून त्यांच्या वाहनाचे नुकसान केले. तसेच, डिघोळे यांच्याकडील ४२ हजार रुपये रोख रक्कम हिसकावून आरोपींनी रोड रॉबरी करून घटनास्थळावरून पलायन केले.

रोड रॉबरी

या प्रकरणी शनिशिंगणापूर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०९(६) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

मानवी कौशल्याच्या आधारे पोलिसांनी लावला छडा

या गुन्ह्याचा तपास करताना शनिशिंगणापूर पोलीस ठाण्याचे अधिकारी व अंमलदारांनी मानवी कौशल्य आणि तांत्रिक तपासाच्या आधारे तिन्ही अनोळखी आरोपींचा शोध घेतला. तपासात आरोपी निष्पन्न झाल्यानंतर दि. ८ एप्रिल रोजी तिघांनाही अटक करण्यात आली. पोलिसांनी आरोपींचे पोलीस कोठडीचे अधिकार राखून ठेवत न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.

या गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे (अहिल्यानगर), अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे (श्रीरामपूर), आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नीरज राजगुरू (शेवगाव) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला.

रोड रॉबरी

या कारवाईत शनिशिंगणापूर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी आशिष शेळके (सहाय्यक पोलीस निरीक्षक),
सहाय्यक फौजदार कारखेले, सहाय्यक फौजदार ज्ञानेश्वर माळवे, दत्तात्रय पवार, पोलीस हवालदार गुलाब मोकाटे,
आदेश घोडके, रमेश लबडे, तसेच पोलीस कॉन्स्टेबल मृत्युंजय मोरे आणि रवींद्र गर्जे यांनी सहभाग घेतला.

रोड रॉबरी

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

रोड रॉबरी
रोड रॉबरी
रोड रॉबरी

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

रोड रॉबरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!