Ashok Kharat : जमिनीसाठी नॅशनलाइज बँक खात्याचा वापर
Ashok Kharat : नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात जसाजसा तपास पुढे जात आहे. या प्रकरणात नवनवीन खुलासे होत आहेत. आता अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा झाला आहे. आरोपींच्या खात्यांत मागील दोन वर्षांत 21 कोटींपेक्षा अधिक व्यवहार झाल्याचे समोर आलं आहे. जमीन खरेदीपूर्वी खात्यात 3 कोटींची उलाढाल उघड झाला आहे. नाशिकच्या दाम्पत्यासह शेवगावच्या चौघांची या प्रकरणात चौकशी होणार आहे. तर अशोक खरातच्या दोन बँक खात्यांमध्ये RTGS ने कोट्यवधींचे व्यवहार झाले आहेत. शिर्डीतील 4 एकर जमीन 5 कोटींना खरेदी केल्याची माहिती समोर आली आहे. तर रावसाहेब गोंदकर यांच्या तक्रारीनंतर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशोक खरात, पत्नी कल्पना खरातसह इतरांवर कारवाई करण्यात येणार आहे.

दरम्यान दीपक लोंढे पोलिसांच्या रडारवर आहे. त्याचा आर्थिक व्यवहारांची चौकशी तर दुसरीकडे चौथ्या गुन्ह्याप्रकरणी अशोक खरातला ठरा एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. महिलांचे शोषण करणाऱ्या अशोक खरातनं अनेक व्यवसायिक तसंच गृहस्थांनाही लुबाडल आहे. एवढंच नाहीतर जमीन व्यवहारात नॅशनलाईज बँकेसंबंधी नवा कारनामा तपासात समोर आला आहे. यामुळे अशोक खरातचा पाय आणखी खोलात गेले असून दिवसेंदिवस त्याच्या अडचणीत वाढ होतेय. परिणामी अशोक खरातचे आर्थिक व्यवहारातील भागीदार आता SIT च्या रडारवर राहणार आहे.

एवढंच नाही तर सलग दोन दिवस नाशिक, शिर्डी आणि पुणे अशा एकूण 11 ठिकाणांवर ईडीने कारवाई केली आहे. खरातच्या आर्थिक साम्राज्याचा भांडाफोड करण्यासाठी ईडीने सर्च ऑपरेशन हाती घेतलं आहे. या छापेमारीत कोट्यवधींच्या मालमत्तांचे पुरावे ईडीच्या हाती लागले आहेत. या कारवाईत खरातची 2 कोटी 50 लाखांची बँकेतील रक्कम गोठवण्यात आले आहे. एक आलिशान मर्सिडीज बेंझ कार जप्त केली आहे. याशिवाय, खरातचा चार्टर्ड अकाउंटंट प्रकाश पोफळे याच्या पुण्यातील राहत्या घरातून 42 लाखांची रोख रक्कम कारवाईत जप्त करण्यात आली आहे.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.







