
आपला जिल्हा : महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष म्हणून गेली १५ वर्षे कार्य करणारे ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांनी वयाची ७५ पूर्ण करीत असल्यामुळे आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. १५ एप्रिल २०२६ रोजी त्यांनी आपला राजीनामा संचालक मंडळाकडे सोपविला.

राज्यातील सहकारी पतसंस्थांचे शिखर संस्था असलेल्या राज्य फेडरेशनच्या अध्यक्षपदाची जबाबदारी अत्यंत व्यापक असून, राज्यभर सतत प्रवास करणे आवश्यक असते. मात्र, वयाची ७५ वर्षे पूर्ण झाल्यानंतर वाढत्या प्रकृतीच्या अडचणींमुळे हा प्रवास करणे अवघड झाले आहे. यासंदर्भात वैद्यकीय तज्ज्ञांनीही विश्रांतीचा सल्ला दिल्याने काका कोयटे यांनी हा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले आहे.
तसेच राज्य फेडरेशनच्या दैनंदिन कामकाजावर परिणाम होऊ नये, तसेच संस्थेच्या कार्यात सातत्य राहावे, या उद्देशाने त्यांनी स्वेच्छेने पदाचा राजीनामा दिला असल्याचे त्यांनी नमूद केले.

दरम्यान, काही माध्यमांमध्ये त्यांच्या राजीनाम्याबाबत चुकीच्या आणि विपर्यस्त बातम्या प्रसारित होत असल्याचेही निदर्शनास आले आहे. “माझा राजीनामा हा पूर्णपणे प्रकृतीच्या कारणास्तव असून, इतर कोणत्याही वादग्रस्त प्रकरणाशी त्याचा संबंध नाही,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.








