आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
विकास लवांडे

नेवासा | प्रतिनिधी – महाराष्ट्रातील संत महंतांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) अडचणीत सापडला असून या प्रकरणात आता न्यायालयीन हालचालींना वेग आला आहे. पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांना नेवासा न्यायालयाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

सविस्तर वृत्त असे की, दिनांक १६ एप्रिल रोजी मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत विकास लवांडे यांनी महाराष्ट्रातील सुमारे २० संत महंतांवर गंभीर आरोप केले होते. त्यांनी या संतांना “घुसखोर” संबोधत त्यांच्यावर प्रतिगामी असल्याचा ठपका ठेवला. या वक्तव्यामुळे धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करण्यात आला आहे.

विकास लवांडे

याचबरोबर, संबंधित वक्तव्यांनंतर सोशल मीडियावरील फेसबुक पेजद्वारेही संत महंतांची बदनामी सुरूच ठेवण्यात आल्याचा आरोप आहे. या पार्श्वभूमीवर नेवासा येथील विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा धर्माचार्य संपर्क प्रमुख प्रशांत बहिरट यांनी नेवासा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याची मागणी केली.

नेवासा पोलिसांनी या प्रकरणी अदखलपात्र गुन्हा नोंदवून घेतला. मात्र, यावर समाधान न झाल्याने फिर्यादींकडून नेवासा येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी (JMFC) न्यायालयात प्रायव्हेट कंप्लेंट दाखल करण्यात आली. या अर्जाचा क्रमांक ९८/२०२६ असा आहे.

विकास लवांडे

या प्रकरणाची सुनावणी प्रथम वर्ग न्यायाधीश एल. ए. काळे यांच्या समोर झाली. यावेळी अॅड. मयूर वाखुरे यांनी प्राथमिक युक्तिवाद सादर केल्यानंतर न्यायालयाने विकास लवांडे यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश दिले.

दरम्यान, या आदेशामुळे विकास लवांडे यांना नेवासा न्यायालयात हजर राहून आपली बाजू मांडावी लागणार आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी २२ मे रोजी होणार असून, त्या दिवशी लवांडे उपस्थित राहणार का याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

या नोटीसमुळे सकल हिंदू समाजाच्या वतीने समाधान व्यक्त करण्यात आले असून, पुढील सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

विकास लवांडे
newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

विकास लवांडे

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

विकास लवांडे
विकास लवांडे
विकास लवांडे

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

विकास लवांडे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!