
नेवासा – नेवासा तालुक्यात सोमवारी (दि. २७) गोमातेच्या सन्मानासाठी आणि विविध मागण्यांसाठी मोठ्या प्रमाणावर “गोमाता सन्मान आवाहन व स्वाक्षरी अभियान” राबविण्यात येणार आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून सामूहिक निवेदन तहसीलदारांना सादर करण्यात येणार आहे.

सकाळी ९ वाजता भास्करगिरी महाराज यांच्या उपस्थितीत या अभियानाची सुरुवात होणार असून, मोहिनीराज मंदिर ते तहसील कार्यालय या मार्गे रॅली काढण्यात येणार आहे. या रॅलीत संत, महंत, वारकरी संप्रदाय, सकल हिंदू समाज, गोसेवक आणि गोरक्षक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.

या अभियानामध्ये प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे आहेत —
भारतामध्ये गोहत्या पूर्णपणे बंद करण्यासाठी कठोर कायदा करण्यात यावा, गायीला राष्ट्रीय वारसा म्हणून मान्यता देण्यात यावी, गोसेवेसाठी स्वतंत्र केंद्रीय मंत्रालय स्थापन करावे, तसेच गोधन बोर्ड स्थापन करण्याची मागणी करण्यात येणार आहे.
या पार्श्वभूमीवर नेवासा तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने या अभियानात सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. या उपक्रमामुळे गोमातेच्या संरक्षणाबाबत जनजागृती निर्माण होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.








