
नेवासा- तालुक्याची खरीप पूर्व हंगाम आढावा बैठक दिनांक 27 एप्रिल 2026 रोजी रेणुका माता सभागृहात अभ्यासपूर्ण वातावरणात संपन्न झाली आढाव बैठकीच्या अध्यक्षस्थानी आमदार विठ्ठलराव लंघे पाटील होते. याप्रसंगी कृषी शास्त्रज्ञ डॉक्टर अशोकराव ढगे यांनी यावर्षी पाऊसमान कमी असण्याची शक्यता भारतीय हवामान विभाग यांनी वर्तवली आहे त्यासाठी कमी कालावधीची व कमी पाणी लागणारे पिके घ्यावीत उदाहरणार्थ खरीप हंगामात वाटाणा व त्याची जात आरके घ्यावी अशी सूचना केली तसेच नेवासा तालुक्यात उसाची लागवड मोठ्या प्रमाणात झाली आहे पाण्याचा ताण पडल्यास आपत्कालीन व्यवस्था म्हणून सिलिकॉन या अन्नद्रव्याचा फवारणी द्वारे ड्रोन उपयोग करून उत्पादन स्थिर ठेवावे. तुरीचे पीक क्षेत्र वाढवावे व व कपाशीचे पीक घेतल्यास त्यामध्ये तुरीचे पट्टे जास्त प्रमाणात मिश्र पीक म्हणून घ्यावे.

शेतकरी बांधवांनी गव्हाचा काड जाळू नये तो शेतात गाडावा सेंद्रिय पदार्थाची जमीन सुपीकतेसाठी त्याचा उपयोग होतो शिवाय जाळल्यास जिवाणू मरतात. खरीप पूर्व हंगाम आढावा बैठकीसाठी तहसीलदार डॉक्टर संजय बिरादार गटविकास अधिकारी लखनवाल जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे उपविभागीय अधिकारी तसेच कृषी अधिकारी व कृषी सहाय्यक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते प्रगतशील शेतकऱ्यांनी चर्चेत सहभाग घेऊन सहभाग घेऊन महत्त्वाच्या सूचना केल्या. सुरुवातीला तालुका कृषी अधिकारी धनंजय हिरवे यांनी प्रास्ताविक करून सादरीकरण उत्तम प्रकारे केले व सर्वांचे स्वागत केले याप्रसंगी संकटग्रस्त व अपघात झालेल्या शेतकऱ्यांना चेकचे वितरण आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले तसेच नेवासा तालुक्यातील काही उत्तम कामगिरी करणाऱ्या कृषी अधिकारी व ग्राम अधिकारी यांचा सन्मान करण्यात आला.

अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांनी कृषी खात्याच्या विविध योजनांची माहिती दिली खतांचा बियाणांचा व कीटकनाशकांचा तुटवडा होऊ देणार नाही अशी ग्वाही दिली. पीक रचना खतांचा वापर माती परीक्षण यासंदर्भात सांगोपांग चर्चा झाली. आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांनी मार्गदर्शनपर अभ्यासपूर्ण भाषणात अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांचे विस्तारीकरण करून कर्मचाऱ्यांनी चांगले काम करावे अशी अपेक्षा व्यक्त व्यक्त केली. शेती व शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी माननीय लंघे विधानसभेत तत्पर व दक्ष असतात त्यांच्या अभिनंदन डॉक्टर ढगे यांनी मांडला त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद टाळ्यांच्या गजरात मिळाला. आभार प्रदर्शन मंडल कृषी अधिकारी सुहास धस यांनी केले सूत्रसंचालन आत्माचे श्री शैलेश आहेर यांनी उत्तम प्रकारे केले


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.







