अ. नगर:- कौटुंबिक न्यायालय अहिल्यानगर येथे आज सकाळी राष्ट्रीय लोक आदालतीचे उद्घाटन कौटुंबिक न्यायालयाच्या न्यायाधीश श्रीमती संगीता भालेराव यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. यावेळी लोक अदालतीचे पॅनल प्रमुख जिल्हा न्यायाधीश एम एस भदाणे मॅडम सदस्य ॲड एस पी जोशी मॅडम कौटुंबिक न्यायालय होते संघाचे अध्यक्ष ॲड लक्ष्मण कचरे उपाध्यक्ष ॲड सुरेश लगड कार्याध्यक्ष ॲड शिवाजी सांगळे व सचिव ॲड राजेश कावरे आदी मान्यवर उपस्थित होते सदर लोकन्यायालयाचे उद्घाटन रामशास्त्री प्रभुणे न्यायमूर्ती यांचे पुतळ्यास अभिवादन करून करण्यात आले .

सदर लोकन्यायालयात पती मंगेश गायकवाड व पत्नी शशिकला गायकवाड यांचे मध्ये गेले अनेक वर्षापासून न्यायालयात पोटगी मिळणे बाबतचा दावा चालू होता व पत्नी ही गेले दहा वर्षांपासून तिचे माहेरी राहत होती सदर प्रकरणात पत्नी पतीकडे नांदण्यास जाण्यास तयार झाल्याने व त्यांच्यामध्ये सलोखा घडून आणण्यात ॲड वैभव कदम यांनी मोलाची कामगिरी केली यावेळी कौटुंबिक न्यायालयाचे प्रबंधक एन आर धोंडगे,सहाय्यक अधीक्षक आसिफ शेख, कर्मचारी रोहित गुंडू, श्रीमती एस एस चव्हाण मॅडम ,धीरज नारखेडे, सचिन जाधव ,श्रीमती एल एस जाधव, झिंजे मॅडम, विकास वाघमारे , पोलीस कर्मचारी आणि पक्षकार मोठ्या संख्येने उपस्थित होते

यावेळी न्यायाधीश संगीता भालेराव मॅडम यांनी “वेळ व पैसा वाचवण्यासाठी लोक अदालत काळाची गरज असल्याचे प्रतिपादन केले सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड राजेश कावरे यांनी केले तर प्रास्ताविक ॲड लक्ष्मण कचरे यांनी केले व आभार प्रदर्शन ॲड शिवाजी सांगळे यांनी केले.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.







