जुन्नरमध्ये पित्याचा अमानुष कृत्य; मुलांना फिरायला नेऊन जंगलात गळा दाबला, मुलगी ठार तर मुलगा आर्यन रडत महामार्गावर पोहोचल्याने प्रकरण उघड
जुन्नर तालुक्यातील आळे खिंड परिसरात एका निर्दयी पित्याने दोन मुलांचा गळा दाबून खून करण्याचा प्रयत्न केला. यात साडेतीन वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला असून, पाच वर्षांचा मुलगा गंभीर जखमी अवस्थेतून बचावला आहे. आळेफाटा पोलिसांनी आरोपी पित्याला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सागर सदाशिव शिंदे (वय २९, रा. मोशी, ता. हवेली) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याने मंगळवारी (ता. ५) सकाळी आपली मुले हर्षदा (वय साडेतीन) आणि आर्यन (वय पाच) यांना फिरायला नेण्याच्या बहाण्याने आळे खिंड येथील जंगलात नेले.
तिथे त्याने त्यांचा निर्दयपणे गळा दाबून त्यांना मृत समजून जंगलात फेकून दिले. दरम्यान, बुधवारी सकाळी मुलगा आर्यन शुद्धीवर आला. तो रडतरडत पुणे- नाशिक महामार्गावर पोहोचला. स्थानिकांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी मुलाकडे चौकशी केली असता हा प्रकार उघडकीस आला. त्याने आपले नाव आणि गाव सांगितले.

पोलिसांनी नातेवाइकांना संपर्क साधला असता या मुलाचे आजोबा लक्ष्मण शिंदे नातेवाइकांसह आळेफाटा पोलिस ठाण्याला आले. त्यांनी हा आपलाच नातू असल्याचे सांगितले. आळेफाटा पोलिसांनी मुलगा व नातेवाइकांसह भोसरी एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार दिली.
पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत सागर शिंदे यास चाकण येथून ताब्यात घेतले. चौकशी केली असता त्याने मुलांना आळे खिंड येथील जंगलात गळा दाबून टाकल्याचे सांगितले. आळेफाटा पोलिसांनी त्यास घटनास्थळी आणले. बुधवारी रात्रीच्या वेळी हर्षदा हिचा मृतदेह मिळून आला. सागर यास अटक केली.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.







