आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
समृद्ध पंचायतराज अभियान

पानेगाव (वार्ताहर) : नेवासे तालुक्यातील पानेगाव येथे दि. ८ रोजी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत ग्रामपंचायतीने गेल्या वर्षभरात केलेल्या विविध विकासकामांची तसेच नावीन्यपूर्ण उपक्रमांची अधिकाऱ्यांच्या समितीने प्रत्यक्ष पाहणी केली.

बीड जिल्ह्यातील माजलगाव पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी ज्योत्स्ना मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी श्रीमती ढाले आणि विस्तार अधिकारी गायकवाड यांच्या समितीने विविध कामांची तपासणी केली.

यावेळी नेवासे पंचायत समितीचे अतिरिक्त गटविकास अधिकारी बाळासाहेब कासार आणि शेळके भाऊसाहेब उपस्थित होते.

समृद्ध पंचायतराज अभियान

सप्टेंबरपासून सुरू झालेल्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात पानेगाव ग्रामपंचायतीने सुशासनयुक्त पंचायत, गावपातळीवरील संस्था सक्षमीकरण, लोकसहभाग, जलसमृद्धी, वृक्षारोपण व संवर्धन, स्वच्छ व हरित गाव निर्मिती, सक्षम ग्रामपंचायत, उपजीविका विकास, सामाजिक न्याय आणि नावीन्यपूर्ण उपक्रम या घटकांचा सूक्ष्म अभ्यास करून ग्रामविकासाचा मजबूत पाया उभारला आहे.

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत पानेगाव येथील विकासकामांची पाहणी करताना समितीचे अधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते. श्रमदानातून येथे लोकचळवळ निर्माण झाली आहे.

शासकीय इमारतींसोबतच वृक्षांनाही रंगरंगोटी करण्यात आली असून “स्वच्छ माझे अंगण, समृद्ध माझे गाव”, “स्त्री जन्माचे स्वागत” यांसारखे उपक्रम गावात प्रभावीपणे राबवले जात आहेत.

समृद्ध पंचायतराज अभियान

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात तालुक्यातील जवळपास २२ गावांनी सहभाग नोंदवला असून, त्यामध्ये पानेगाव अग्रेसर ठरत आहे. १९९९ साली संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात सहभागी होऊन पानेगावची राज्यस्तरीय पुरस्कारासाठी निवड झाली होती. त्याच धर्तीवर यंदाही ग्रामपंचायतीच्या विकासकामांच्या माध्यमातून गावाला राज्य शासनाचा सन्मान मिळवून देण्यासाठी ग्रामस्थ ग्रामपंचायत प्रशासनाला सर्वोतोपरी सहकार्य करत आहेत.

पानेगावसह तालुक्यातील अन्य सहभागी गावांतील विकासकामांचीही अधिकाऱ्यांनी पाहणी केली. नावीन्यपूर्ण उपक्रमांचे विशेष कौतुक करत अधिकाऱ्यांनी गावातील सुमारे दोन हजार झाडांचे वृक्षारोपण व संवर्धन, मियावाकी पद्धतीने केलेले यशस्वी वृक्षसंवर्धन, मंदिरांचा जीर्णोद्धार, वाचनसंस्कृती रुजविण्यासाठी उभारलेले अद्ययावत वाचनालय, सुसज्ज ग्रामपंचायत कार्यालय, ग्रामसंसद, आकर्षक मोक्षधाम, गावातील स्वच्छता, डिजिटल जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, डिजिटल अंगणवाड्या तसेच भव्य अश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे कौतुक केले.

समृद्ध पंचायतराज अभियान

पानेगावकरांचा एकोपा, लोकसहभाग आणि प्रशासनाचा दूरदृष्टीकोन, तसेच तालुका व ग्रामस्तरावरील अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन आणि राजकारणविरहित वातावरणातून दाखवलेली एकजूट प्रेरणादायी ठरत आहे.

यावेळी पानेगावचे माजी लोकनियुक्त सरपंच संजय जंगले, विद्यमान लोकनियुक्त सरपंच सौ. निकिता भोसले-आंबेकर, उपसरपंच सुरेश जंगले, ग्रामविकास अधिकारी गणेश पाखरे यांच्यासह पदाधिकारी, ग्रामपंचायत कर्मचारी, आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षकवृंद, अंगणवाडी सेविका, आशा सेविका आणि ग्रामस्थ उपस्थित होते.


“छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यामुळे पानेगावची स्वतंत्र ओळख निर्माण झाली आहे. १९९९ साली संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्यापासून गावातील विकासकामांना गती मिळाली. डिजिटल जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, डिजिटल अंगणवाड्या, मंदिरांचा जीर्णोद्धार, वृक्षारोपण व संवर्धन, वाचनसंस्कृती, जलसंवर्धन आणि सुसज्ज ग्रामपंचायत कार्यालय पाहण्यासाठी परिसरातील ग्रामस्थ येथे येत असतात. यंदाही मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात पानेगावची निश्चित निवड होईल, असा विश्वास आहे.”
— संजय जंगले, माजी लोकनियुक्त सरपंच, पानेगाव (ता. नेवासे)

समृद्ध पंचायतराज अभियान
newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

समृद्ध पंचायतराज अभियान
समृद्ध पंचायतराज अभियान
समृद्ध पंचायतराज अभियान

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

समृद्ध पंचायतराज अभियान

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!