घोडेगाव— दि. १४ रोजी मिळालेल्या गुप्त माहिती नुसार माका ते पांढरीपुल रोडच्या कडेला असणे हाॅटेल सचिन शेजारील पत्र्याच्या शेडमध्ये बाबासाहेब काशीनाथ घुले (वय.४८) रा, माका हा विना परवाना बेकायदा देशी दारुची विक्री करत असताना मिळून आला. रुपये ६४० किंमतीचा मुद्देमाल त्या ठिकाणाहून जप्त करण्यात आला. पोलीस काॅस्टेबल योगेश बोरुडे यांच्या फिर्यादी वरून गुन्हा र नं१९०/२०२६ महा दारू अधिनियम कलम ६५(इ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल नानासाहेब तुपे हे करत आहेत. किशोर सिताराम केळगंद्रे (वय.६०) रा. चांदा हा गावात एका पत्र्याच्या टपरी मध्ये कल्याण मटका नावाचा हारजीतीचा खेळ खेळताना व खेळविताना मिळून आला. ९८० रुपये रोख व खेळण्याचे साहित्य असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलीस काॅस्टेबल महेंद्र पवार यांच्या फिर्यादी वरून गुन्हा र नं. १९१/२०२६ महा. जुगार कायदा कलम १२(अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल दत्ता गावडे हे करत आहेत.

आदिनाथ नामदेव आढाव (वय.४६) रा. लोहारवाडी हा गावच्या शिवारात पत्र्याच्या शेडमध्ये देशी विदेशी कंपन्यांची बेकायदा दारू विक्री करत होता. १७६० रुपये किंमतीची दारू जप्त करण्यात आली. पोलीस काॅस्टेबल महेंद्र पवार यांच्या फिर्यादी वरून गुन्हा र नं, १८९/२६ महा दारू कायदा कलम ६५( ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे .पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल निखिल तमनर हे करत आहेत. सोनई गावातील दहाव्याच्या ओट्याजवळ बाबासाहेब कचरु भोसले (वय.४९) हा विना परवाना कल्याण मटका नावाचा हारजीतीचा खेळ खेळताना व खेळविताना मिळून आला १९० रुपये रोख रक्कम व खेळण्याचे साहित्य त्या ठिकाणाहून जप्त करण्यात आले. पोलीस काॅस्टेबल निखिल तमनर यांच्या फिर्यादी वरून गुन्हा र नं. १९२/२०२६ महा जुगार प्रतिबंध कायदा कलम १२(अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक देवीदास आव्हाड हे करत आहेत.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.







