आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
भागवत कथा

देवगड : त्रैवार्षिक पुरुषोत्तम मासानिमित्त नेवासा तालुक्यातील भू-लोकीचा स्वर्ग म्हणून ओळख असलेल्या श्री गुरुदेव दत्त पीठ क्षेत्र देवगड येथे राजस्थानमधील जोधपूर येथील गोवत्स श्री राधाकृष्णजी महाराज यांच्या श्रीमद भागवत कथा सोहळ्याला भागवत ग्रंथाच्या भव्य शोभायात्रा मिरवणुकीने आणि गोमातेच्या पूजनाने उत्साहात प्रारंभ झाला.

भागवत कथा

पुरुषोत्तम मासाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या या श्रीमद भागवत कथा व कीर्तन सोहळ्याला “विठ्ठल भक्तीरस महोत्सव” असे नाव देण्यात आले आहे. देवगड येथील प्रांगणातून टाळ-मृदुंगाच्या गजरात शोभायात्रेला सुरुवात झाली. या मिरवणुकीत गोवत्स श्री राधाकृष्णजी महाराज, देवगड दत्त पीठाचे प्रमुख महंत गुरुवर्य श्री भास्करगिरीजी महाराज, उत्तराधिकारी स्वामी प्रकाशानंदगिरीजी महाराज यांच्यासह वारकरी संप्रदायातील संत, महंत, कीर्तनकार, प्रवचनकार तसेच महिला व पुरुष भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

शोभायात्रेदरम्यान गोशाळेतील गोमातेचे पूजन तसेच गंगा पात्रात जाऊन गंगेचे पूजन करण्यात आले. यावेळी गोवत्स श्री राधाकृष्णजी महाराज, गुरुवर्य श्री भास्करगिरीजी महाराज आणि स्वामी प्रकाशानंदगिरीजी महाराज यांच्या हस्ते विधिवत पूजा करण्यात आली. तसेच भगवान दत्तात्रय व श्री समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबांच्या समाधी मंदिरात जाऊन मूर्तींचे पूजन करण्यात आले.

भागवत कथा

ज्ञानसागर सभामंडपात शोभायात्रेचा समारोप करण्यात आला. यावेळी गुरुवर्य श्री भास्करगिरीजी महाराज व स्वामी प्रकाशानंदगिरीजी महाराज यांच्या हस्ते श्रीमद भागवत ग्रंथाचे पूजन करण्यात आले, तर गोवत्स श्री राधाकृष्णजी महाराज यांचा तुळशीहार घालून संतपूजन सोहळा पार पडला.

यावेळी मार्गदर्शन करताना गुरुवर्य श्री भास्करगिरीजी महाराज म्हणाले की, “गोवत्स श्री राधाकृष्णजी महाराज हे भागवत कथेच्या माध्यमातून भक्तांना सुख, समाधान आणि अध्यात्मिक मार्ग दाखविण्याचे कार्य करत आहेत. भागवत कथा ही पूर्व पुण्याईने श्रवण करण्याची संधी मिळते. या कथेमधून गोपालकृष्ण भगवंताचे चरित्र ऐकण्याचा लाभ भाविकांना मिळणार असून त्यातून भक्तांना आध्यात्मिक आनंद प्राप्त होणार आहे.”

भागवत कथा

ते पुढे म्हणाले, “जगात कसे जगावे हे भगवद्गीता शिकवते, तर कसे मरावे हे भागवत शिकवते. जन्म-मरणाचे साकडे कथा श्रवणाने सुटते. त्यामुळे सर्वांनी या पवित्र पर्वकाळात कथा श्रवणाचा लाभ घेऊन बाह्य व आंतरिक आनंद मिळवावा.”

भागवत कथा सोहळ्याच्या प्रारंभी कथा श्रवणासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.

भागवत कथा
भागवत कथा

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

भागवत कथा
भागवत कथा
भागवत कथा

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

भागवत कथा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!