अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गँगरेपची तक्रार देण्यासाठी आलेल्या पीडित महिलेची फिर्याद घेण्यास पोलिसांनी टाळाटाळ केल्याचा गंभीर आरोप होत असून, संतप्त पीडितेने थेट पाथर्डी पोलिस ठाण्यासमोर स्वतःसह मुलाच्या अंगावर ज्वलनशील द्रव्य ओतून आत्महत्येचा प्रयत्न केला.
या घटनेनंतर पोलिस ठाण्यात मोठा गोंधळ उडाला. दरम्यान, पीडितेसोबत आलेल्या व्यक्तीचा संशयास्पदरीत्या मृत्यू झाल्याने प्रकरण अधिकच चिघळले आहे. मृत व्यक्तीचे नाव विठ्ठल रावसाहेब खर्चन (वय 45, रा. आखेगाव, ता. शेवगाव) असे आहे. या संपूर्ण प्रकारामुळे पाथर्डी पोलिसांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

या प्रकरणी अखेरीस सोमवारी रात्री गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. त्यावेळी आरोपी पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाले. मिळालेल्या माहितीनुसार, पाथर्डी पोलीस ठाण्यात रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. काही दिवसांपूर्वी एका महिलेवर सामूहिक अत्याचार करण्यात आला होता. पीडित महिलेनं याबद्दल वारंवार तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला. पण, तक्रार दाखल केली गेली नाही, असा आरोप पीडितेचा आहे. या प्रकरणी अखेरीस सोमवारी रात्री गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. त्यावेळी आरोपी पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाले.

त्यामुळे गँगरेप सारख्या गंभीर अत्याचार पीडित महिलेची तक्रार दाखल करण्याच्या प्रक्रियेदरम्यान मोठा गोंधळ उडाला. आरोपींकडून पीडित महिला, तिचा मुलगा आणि नातेवाईकांवर दबाव आणल्याचा आरोप करण्यात आला आहे. तणावपूर्ण वातावरणात पीडित महिला आणि तिच्या मुलाने अंगावर पेट्रोल ओतून जीव देण्याची धमकी दिली. याच दरम्यान महिलेला मदत करण्यासाठी आलेल्या एका इसमाने धाव घेतली, पण यावेळी झालेल्या झटपट्टीमध्ये हा इसम खाली पडला.

दरम्यान झालेल्या झटापटीत मदतीला आलेला हा इसम गंभीर जखमी झाला होता. त्याला तातडीने शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. पण, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
या प्रकरणानंतर पाथर्डी पोलीस ठाण्याच्या कारभारावर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहे. सामूहिक अत्याचाराच्या प्रकरणात तक्रार उशिराने दाखल झाल्याने पोलीस प्रशासनावर टीका होत आहे. संपूर्ण घटनेची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे, पीडितेच्या नातेवाईकांनी केली आहे. या घटनेबद्दल अद्याप पोलिसांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.







