शिवसेनेच्या ६० व्या वर्धापन दिनानिमित्त शेवगाव शहरातील उचल फाउंडेशन येथे निराधार मुलांना किराणा साहित्य व खाऊचे वाटप करून सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविण्यात आले. शिवसेना उपनेते अरुण मुंढे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या उपक्रमास शिवसैनिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
यावेळी बोलताना मुंढे म्हणाले, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेल्या समाजसेवेच्या विचारांचा वारसा शिवसेना आजही जपत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पक्ष सर्वसामान्य, गरजू व वंचित घटकांच्या प्रश्नांवर सातत्याने कार्यरत असून समाजातील शेवटच्या घटकापर्यंत मदतीचा हात पोहोचविण्याचा प्रयत्न करीत आहे.

आगामी जिल्हा परिषद व इतर निवडणुकांमध्ये शिवसेना पूर्ण ताकदीने मैदानात उतरणार असून जनतेच्या विश्वासाच्या बळावर पक्षाला अधिक बळकटी देण्याचा निर्धार करण्यात आला आहे. वर्धापन दिनासारख्या महत्त्वाच्या दिवशी निराधार मुलांसोबत आनंद वाटून घेणे हीच खरी शिवसेनेची संस्कृती असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उचल फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. संजय लड्डा होते.

यावेळी नगरसेवक आशुतोष डहाळे, साईनाथ आघाट, रोहित काथवटे, सुनिल काकडे,सालारभाई शेख, प्रेमसुख जाजू, राजू तरटे, माजी नगरसेवक दिगंबर काथवटे, अंकुश कुसळकर, विजय धनवडे, कानिफ साखरे, अशोकराव आधाट, सुनील जगताप, अभय पालवे, विशाल आव्हाड, नाना कर्डिले यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, शिवसैनिक व सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उपक्रमाअंतर्गत निराधार मुलांना जीवनावश्यक किराणा साहित्य व खाऊचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे मुलांच्या चेहऱ्यावर आनंद खुलला. समाजसेवा, मानवता आणि सामाजिक उत्तरदायित्वाचा संदेश देणाऱ्या या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत उचल फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी केले, तर उचल फाउंडेशनचे सचिव बाळासाहेब खेडकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.







